शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

बांधकाम व्यवसाय येतोय रुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:52 IST

अकोला : तीन वर्षांपासून ठप्प पडलेला अकोल्यातील बांधकाम व्यवसाय पूर्ववत रुळावर येत आहे. कृत्रिम दरवाढीमुळे अकोल्यातील पाचशे बिल्डर्स मंडळी बँक आणि खासगी कर्जाच्या चक्रात अडकली होती; मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत पुन्हा उभारी येत असून, बांधकाम व्यवसाय तेजीत येत आहे.

ठळक मुद्देदलालांच्या कृत्रिम दरवाढीतून सुटका अकोल्यात ३८00 फ्लॅट तयार!

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तीन वर्षांपासून ठप्प पडलेला अकोल्यातील बांधकाम व्यवसाय पूर्ववत रुळावर येत आहे. कृत्रिम दरवाढीमुळे अकोल्यातील पाचशे बिल्डर्स मंडळी बँक आणि खासगी कर्जाच्या चक्रात अडकली होती; मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत पुन्हा उभारी येत असून, बांधकाम व्यवसाय तेजीत येत आहे.ब्रोकर आणि बिल्डसर्ंकडून  झालेली दरवाढ अंगलट आल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प पडला होता. महापालिकेने लावलेला कारवाईचा अंकुश आणि जीएसटीमुळे बिल्डरांसह बांधकाम व्यावसायिकांवर अवकळा आली होती;  मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारात नवचैतन्य आले असून, फ्लॅट खरेदीसाठी अकोलेकर पुन्हा सरसावू लागले आहेत. मागणी वाढल्याने कर्जात सापडलेले बिल्डर्संना दिलासा मिळाला आहे. काही जुने आणि नवीन मिळून जवळपास ३८00 फ्लॅट ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.  १९८0 च्या डीसीआरनुसारच अकोल्यात बांधकाम व्यावसायिकांचे कामकाज सुरू होते. महापालिका झाली; पण बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा पत्ता नव्हता. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी शहरातील १८६ इमारतींना नोटीस बजावून, अवैध बांधकाम थांबविले. तेव्हापासून या इमारतींचे बांधकाम रखडले असून, नवीन बांधकामाला मनपाकडून परवानगी नाकारली जात होती. त्यामुळे अकोल्यातील बांधकाम व्यवसाय ठप्प पडला. दरम्यान, क्रेडाईच्या पुढाकारानंतर ‘ड’ वर्गीय महापालिकांना एक ‘एफएसआय’ वाढवून देण्यात आला. दरम्यान, नवीन ‘ऑटो डीसीआर’च्या मंजुरीनंतर आणि १ एप्रिल १७ पासूनच्या नवीन ‘रेडिरेकनर’च्या बाजार मूल्यभावाने अकोल्यातील फ्लॅटच्या किमती अधिक वाढल्या. अवैध बांधकामाची धास्ती आणि पूर्वीपेक्षाही घर महागणार असल्याने बांधकाम व्यावसायिक चिंतातूर झाले होते; मात्र दलालांनी   फुगविलेली कृत्रिम दरवाढ आता थांबल्याने ग्राहक आणि बिल्डर्स सावरले आहेत.  

अकोल्यातील बिल्डर्संची स्थिती राज्यातील उद्ध्वस्त शेतकर्‍यांसारखी झाली होती . नोटाबंदी, रेरा कायद्याच्या अंमलबजावणीनंतर मोठा परिणाम दिसून आला; मात्र आता पुन्हा बाजारपेठेत चांगली स्थिती निर्माण होत आहे. -दिलीप चौधरी, अकोला जिल्हाध्यक्ष, क्रेडाई.-