शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त निघाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:06 IST

अकोला: शहर विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २६ फेब्रुवारी रोजी सभेत सादर केला जाणार आहे.

अकोला: शहर विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २६ फेब्रुवारी रोजी सभेत सादर केला जाणार आहे. सकाळी ११ वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सत्ताधारी भाजप व प्रशासन नेमक्या कोणत्या कामांना प्राधान्य देते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.महापालिका प्रशासनाने उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित करवाढ केली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली निघण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. याव्यतिरिक्त जमा रकमेतून शासनाची देणी व इतर विकास कामांच्या निधीत आर्थिक हिस्सा जमा करण्याचे प्रयोजन आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात भूमिगत गटार योजना व पाणीपुरवठा योजनेची कामे निकाली काढल्या जात असून, त्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. एकूणच, मनपाला प्राप्त उत्पन्न व जमा-खर्चाचा ताळमेळ घालून शहरातील विकासाची कामे निकाली काढण्याचा आयुक्त संजय कापडणीस यांचा प्रयत्न राहील. त्यानुषंगाने प्रशासनाने २०१९-२० वर्षासाठी अर्थसंकल्प तयार केला असून, तो येत्या २६ फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर केला जाणार आहे.शुक्रवारी स्थगित सभेचे आयोजनमहापालिकेच्या मुख्य सभागृहात २२ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत ऐनवेळेवर महापौर विजय अग्रवाल यांना प्रकृती बिघडल्यामुळे सदर सभा स्थगित करण्यात आली होती. या स्थगित सभेचे आयोजन २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्य सभागृहात करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका