शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९०० वस्त्यांमध्ये कामांची मागविली अंदाजपत्रके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:12 IST

अकोला: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास ( दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांत ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी ...

अकोला: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास ( दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांत ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी मंजूर ५० कोटी रुपयांच्या निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी २४ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने ९०० वस्त्यांमध्ये कामांची अंदाजपत्रके जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून (बीडीओ) मागविण्यात आली आहेत.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे ( दलित वस्ती) योजनेंतर्गत चालू् आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये ९०० वस्त्यांमध्ये सामाजिक सभागृह, रस्ते, नाल्या, गटारे, पाणीपुरवठा आदी विकासकामे करण्यासाठी शासनामार्फत ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने योजनेंतर्गत जिल्हयातील ९०० वस्त्यांमध्ये विकासकामांचे नियोजन जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले असून, या कामांसाठी मंजूर निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार योजनेंतर्गत कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी २४ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला. त्यानुषंगाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून दलित वस्तीच्या कामांची अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत. मंगळवार,३० मार्चपर्यंत दलित वस्तीच्या कामांची अंदाजपत्रके सादर करण्याचे निर्देश पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे ( दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांमधील ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यापैकी आतापर्यंत २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर निधीतून विकासकामे करण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून कामांची अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत.

आकाश शिरसाट

सभापती, समाजकल्याण, जिल्हा परिषद.

मागणी ५० कोटींची

मिळाले २५ कोटी!

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे ( दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९०० वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यानुषंगाने ५० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला; मात्र मागणीच्या तुलनेत २५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला असून, उर्वरित २५ कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा केली जात आहे.