शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीची चाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:15 IST

अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीचे प्रंचड नुकसान होत असून, विदर्भातील शेकडो शेतकºयांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला.

ठळक मुद्देकपाशीचे नुकसानशेतकºयांवर अस्मानी,सुल्तानी संकटाची मालिका

- राजरत्न सिरसाट

अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीचे प्रंचड नुकसान होत असून, विदर्भातील शेकडो शेतकºयांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला.या अस्मानी, सुल्तानी संकटाचा सामना करताना, शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या प्रंचड खचला आहे.राज्यात यावर्षी ४१ लाख हेक्टर कपाशीची पेरणी करण्यात आली असून, विदर्भात १६ लाख ४५ हजार ६०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. मराठवाडा १६ लाख ९२ हजार ४१६, खान्देश ७ लाख ८८ हजार १५, तर पश्चिम महाराष्ट्रात २३ हजार ११८ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी राज्यात १० टक्के कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. कपाशीचे पीकही जोरदर आले पण अळ््याने आक्रमण केल्याने हे पीक हातात किती पडते, हा प्रश्न आहे.विदर्भात मान्सूनपूर्व कपाशी पेरणी केली जाते. या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पात्या आणि फुले गळती होवून कपाशीचे नुकसान झाले. आता या अळीने नियमित खरीप हंगामातील कपाशी पिकांवर आक्रमण केले असून, अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्याने शेकडो शेतकºयांनी या पिकांवर नागर फिरवला.या अळीच्या आक्रमणामुळे ठिकाणी कपाशीची फुले अर्धवट उमलली असून, गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच डोमकळी म्हटले जाते. कपाशीची बोंडे धरायला आल्यापासूनच या अळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये झाला. शेतकºयांनी सर्वप्रकारची किटकनाशके वापरू न नियंत्रण मिळवायचे प्रयत्न केले पण प्रादुर्भाव अधिक असल्याने शेतकºयांनी शेवटी या अळीपुढे हार पत्करली.

 कपाशीची प्रत घसरली !बोंडामध्ये ही अळी एकदा शिरल्यास बोंडावरील छिद्र बंद होतात. त्यामुळे बोंडाचे वरू न निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही; परंतु हिरवी बोंडअळी फोडून बघितल्यास, प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात. त्यामुळे प्रतिकूल परिणाम होऊन कपाशीची प्रत बिघडते. बोंडातील अळ््या रुईमधून छिद्र करू न सरकी फस्त करते. त्यामुळे कापसाच्सा रुईची प्रत व सरकीतील तेलाचे प्रमाण खालवते. तसेच बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.

बीटीत बोंडअळी प्रतिबंधक जीनबीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीला प्रतिबंधक तंत्रज्ञान टाकलेले आहे.त्यामुळेच शेतकरी बीटी कपाशीची पेरणी करतात, तथापि मागील सात- आठ वर्षापासून बोंड अळ््यांची प्रतिकारक्षमता वाढल्याचे बघावयास मिळत असून, शेतकरीही त्यामुळे हतबल झाला आहे.-नियमित खरीप हंगामातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, या किडींचा बंदोबस्त एकीकृत व्यवस्थापन ,कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार करण्याची गरज आहे. - डॉ. धनराज उंदिरवाडे, विभाग प्रमुख, किटकशास्त्र विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण