शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीटी वांग्याच्या चाचणीला मान्यता, आता कपाशीची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 10:24 IST

लवकरच बीटी कॉटनलाही मान्यता मिळेल यासाठी नव्या जोमाने पाठपुरावा करण्याची तयारी संघटनने सुरू केली आहे.

अकोला : एचटीबीटी (रासायनिक तणनाशक सहनशील) बियाण्यांवर आपल्या देशात प्रतिबंध आहे. अशा वाणांची अर्थात जनुकीय सुधारित (जेनेटिकली मॉडिफाइड म्हणजेच जीएम) पिकांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी येतो आणि उत्पादनही वाढते, असा दावा शेतकरी संघटेनचा आहे. त्यामुळेच बीटी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात यावी यासाठी शेतकरी संघटनेने सातत्याने आवाज उठविला. अखेर दहा वर्षानंतर देशातील सात राज्यांमध्ये बीटी वांग्यांच्या चाचणी व संशोधनाला मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेनंतर शेतकरी संघटनेच्या आशा पल्लवित झाल्या असून, लवकरच बीटी कॉटनलाही मान्यता मिळेल यासाठी नव्या जोमाने पाठपुरावा करण्याची तयारी संघटनने सुरू केली आहे.देशातील मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बीटी वांग्यावर संशोधन व चाचणीला केंद्र सरकारने हिरवी झेंडी दिली आहे. या राज्यांमध्ये महाराष्टÑाचा समावेश नसला तरी या परवानगीमुळे एचटीबीटीसाठी लढा देणाºया शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाल्याचे मानले जाते. अकोल्यात गेल्या वर्षी २५ जून रोजी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी चक्क प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची पेरणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी १६ शेतकºयांवर गुन्हे दाखल केले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच यावर्षी ६ जून रोजी अकोल्यातील कृषी विभागाने एका शेतकºयावर सापाळा रचून शेतकºयाला अडकविण्याचा प्रयत्न केला. कृषी विभागाला संशय होता की तो शेतकरी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची विक्री करत आहे; मात्र हा सापळा फसला. तो शेतकरी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता निघाल्याने शेतकरी संघटना शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. शेतकरी संघटनेने जाहीरपणे ३५७ शेतकºयांना एचटीबीटी बियाण्यांचे वितरण करून सरकारच्या धोरणाला आव्हान दिले होते. विशेष म्हणजे एचटीबीटीचे बियाणे वाटप करतानाच काही प्रमाण बीटी वांग्यांचे बियाणेही वाटप झाल्याचीही चर्चा होती. त्यामुळे एचटीबीटी बियाण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. या संदर्भात सध्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लढा देत असतानाच केंद्र सरकारने बीटी वांग्याला परवानगी दिल्याने या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच कपाशीच्या संदर्भातही असाच निर्णय येईल, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली.

 

वांग्यामधे बीटी जनुक वापरण्याचे परीक्षण आणि चाचण्यांवरील अधीस्तगन सरकारने मागे घेतले. आधी अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळणे, बाजार समितीचा एकाधिकार संपुष्टात आणणे व करार शेती सुलभ करण्यासंबंधीचे अध्यादेश आणि आता जैव तंत्रज्ञानातील महत्त्वाची शाखा असलेल्या जनुकीय अभियांत्रिकीवरील अधीस्तगन मागे घेऊन शेती क्षेत्रातील तंत्रज्ञानाची वाट मोकळी करणे यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकरी संघटना या निर्णयाचे सहर्ष स्वागत करते. कॉटन संदर्भातही लवकरच असा निर्णय व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत राहू.-ललीत बहाळेराज्य प्रवक्तेशेतकरी संघटना

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती