शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’ देणार बेरोजगार, पदवीधरांना भागीदारीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:21 IST

भारत संचार निगम लिमिटेडच्या विपणन शाखेच्यावतीने आता बेरोजगार आणि पदवीधरांना भागीदारीची संधी दिली जात आहे.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारत संचार निगम लिमिटेडच्या विपणन शाखेच्यावतीने आता बेरोजगार आणि पदवीधरांना भागीदारीची संधी दिली जात असून, तशा प्रकारचे आवाहन आता दूरसंचार विभागाच्या सहायक महाप्रबंधकांकडून केले जात आहे.बीएसएनएल ही शासकीय दूरसंचार कंपनी असून, गत काही वर्षांपासून सातत्याने तोट्यात जात आहे. दरम्यान, काही खाजगी कंपन्या जनमानसात स्थान मिळवित आहेत. जनमानसातील आपले पूर्ववत वैभव प्राप्त करण्यासाठी आता ‘बीएसएनएल’ने धोरणात बदल करीत सेवांचे जाळे पसरविण्यासाठी आता बेरोजगार आणि पदवीधरांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भागीदार करण्याचे आवाहन केले जात असून, खाजगी व्यक्ती, स्थानिक उद्योजक, बेरोजगार, सेवानिवृत्त कर्मचारी यांची मदत घेत आहे. व्यवसायात या घटकांना सोबत घेत उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न बीएसएनएल करीत आहे. गत काही वर्षांत दूरसंचार क्षेत्रात विविध खाजगी कंपन्यांचा शिरकाव झाल्याने ‘बीएसएनएल’च्या सेवेत मरगळ आली होती. खाजगी कंपन्यांनी विकासाचा मोठा पल्ला गाठल्यानंतर आता शासकीय यंत्रणेला जाग आली असून, आता शेवटचे आचके लागत असताना बीएसएनएल कंपनी सावरण्याचा हा शेवटचा प्रयोग सुरू झाला आहे. खाजगी दूरसंचार सेवेला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने खाजगी व्यक्तींमार्फत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सेवादात्यांना घसघशीत आर्थिक लाभ देण्याच्या योजना आखल्या आहेत. त्यासाठी खाजगी व्यक्ती, स्थानिक उद्योजक, बेरोजगार, सेवानिवृत्त कर्मचारी आणि पदवीधरांना भागीदार म्हणून संधी दिली जात आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAkolaअकोला