शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफ जवानाला पोलिसांची धक्काबुक्की

By admin | Updated: May 4, 2017 01:02 IST

तक्रार नाही: दुचाकी अडविल्यावरून झाला वाद

अकोला : डाबकी रोड परिसरात राहणारा एक बीएसएफ जवान जम्मू काश्मीरला जाण्यासाठी मित्रांसोबत दुचाकीने जात असताना, श्रीवास्तव चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडविले. दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केल्यावर त्यांच्यामध्ये वाद झाला. बीएसएफ जवान व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना बुधवारी रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार करण्यात आली नव्हती. डाबकी रोड परिसरात राहणारा बीएसएफ जवान जम्मू काश्मीर येथे कार्यरत आहे. जवान सुटीवर घरी आला होता. सुटी संपल्याने बुधवारी रात्री तो रेल्वेगाडीने जम्मू काश्मीरला रवाना होणार होता. मित्रासोबत जवान दुचाकीने रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाला असता, श्रीवास्तव चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी अडविली आणि दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. जवानामध्ये आपण बीएसएफमध्ये कार्यरत असून, जम्मूला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे जात असल्याचे पोलिसांना सांगितले; परंतु पोलिसांचे समाधान न झाल्याने त्यांनी कागदपत्रांची मागणी केली. यामुळे बीएसएफ जवान व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी जवानाला धक्काबुक्की केल्याची माहिती दिली; परंतु त्यांची नावे कळली नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.