मालेगाव (जि. वाशिम): तालुक्यातील झोडगा येथील दोघा भावांनी स्वत:च्याच अपहरणाची अफवा गावात पसरविली. त्यामुळे २९ जूनच्या रात्री पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, तपासाअंती या घटनेत कुठलेच तथ्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. झोडगा येथील सुनील मुठाळ व ऋषिकेश मुठाळ हे दोघे भाउ २९ जून रोजी वाशिमला गेले. दोघांनीही मद्य प्राशन केल्याने घरचे रागावतील, या भितीपोटी एका विशिष्ट समाजातील मुलांनी आम्हाला मारून वाहनात टाकून नेले व नागरतासला सोडल्याची बतावणी केली. ही बाब गावात पसरताच रात्री १0 वाजता अनेक नागरिक मालेगाव पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवत पेट्रोलिंग केली. यावेळी दोघा भावांपैकी एकजण मोटरसायकल घेवून रस्त्यावर पडल्याचे आढळून आले. त्याला बोलते केले असता, दोघांनीही अपहरणाचे नाटक केल्याचे उघडकीस आले.
भावांनीच रचले स्वत:चे अपहरण नाट्य!
By admin | Updated: July 1, 2016 01:12 IST