शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयात दलाल पुन्हा सक्रिय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:15 IST

रुग्णांना घेरून येथील दलाल त्यांची मदत तर करतात; पण त्या मोबदल्यात त्यांच्याकडून पैसेही घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वैद्यकीय प्रमाणपत्र असो वा वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून देण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना पैसे मोजावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी दलालांचे दर ठरले असून, काही डॉक्टरांकडूनही त्यांना आश्रय मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी एका वॉर्डातून दुसºया वॉर्डात जावे लागते; परंतु या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक नसल्याने रुग्णांची फरपट होते. या रुग्णांना घेरून येथील दलाल त्यांची मदत तर करतात; पण त्या मोबदल्यात त्यांच्याकडून पैसेही घेत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी दलालांना काही डॉक्टरांची साथ मिळत आहे. यातील काही दलाल हे वॉर्डबॉयच्या वेशात फिरत असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक दलालांना येथील कर्मचारी समजतात. त्यामुळे अशा दलालांवर विश्वास ठेवून रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडून वैद्यकीय तपासणीचे काम करून घेतात. हा प्रकार उघडपणे सुरू असूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाºया रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.

हा प्रकार चुकीचा असून, रुग्णांनी उपचारासाठी कोणालाच पैसे देऊ नये, रुग्णांच्या सोयीसाठी मार्गदर्शक फलक लावण्यास प्राधान्य देऊ. शिवाय, रुग्णांच्या मदतीसाठी लवकरच मदत केंद्र सुरू करू.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय