शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१५ कि.मी.च्या मार्गाची ब्रॉडगेज प्रकल्पात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:43 IST

अकोला : अकोला-खंडवा-रतलाम या मीटरगेज रेल्वे मार्गाच्या  रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे  प्रशासन सज्ज झाले आहे. या संपूर्ण प्रकल्पांतर्गत अद्याप सुरू  असलेला शनावाद ते महू हा मीटरगेज रेल्वे मार्ग लवकरच बंद  करण्यात येणार असून, या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान १५ कि.मी.चा  विस्तारित अतिरिक्त रेल्वे  मार्ग तयार करण्यात येणार असल्याची  माहिती आहे. 

ठळक मुद्देलवकरच बंद होणार शनावाद-महू रेल्वेमार्गप्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज

राम देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला-खंडवा-रतलाम या मीटरगेज रेल्वे मार्गाच्या  रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे  प्रशासन सज्ज झाले आहे. या संपूर्ण प्रकल्पांतर्गत अद्याप सुरू  असलेला शनावाद ते महू हा मीटरगेज रेल्वे मार्ग लवकरच बंद  करण्यात येणार असून, या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान १५ कि.मी.चा  विस्तारित अतिरिक्त रेल्वे  मार्ग तयार करण्यात येणार असल्याची  माहिती आहे. मीटरेज रेल्वे मार्ग बंद करण्यापूर्वी द. मध्य रेल्वे प्रशासनाने  अकोला-अकोट-खांडवा या दरम्यान धावणार्‍या महू पॅसेंजर आणि  त्या चालविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य खांडवा रेल्वे विभागाकडे  सुपूर्द केले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खांडवा-शनावाददरम्यानचा  मीटरगेज रेल्वेमार्गही बंद केला; मात्र या संपूर्ण प्रकल्पात अजूनही  सुरू असलेल्या शनावद ते रतलाम या मीटरगेज रेल्वे मार्गावर  खांडवा रेल्वे विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेली पॅसेंजर धावत  आहे. या दोन रेल्वेस्थानकादरम्यान घनदाट अभयारण्य आणि  डोंगर-दर्‍या असून, दरम्यानचा अतिदुर्गम प्रदेश वगळून १५  कि.मी.चा अतिरिक्त ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार  असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.  हा प्रकल्प जलद गतीने मार्गी लागावा यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन  सज्ज झाले असून, लवकरच शनावाद-महूदरम्यानचा मीटरगेज  रेल्वेमार्गसुद्धा बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.