शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक !

By admin | Updated: August 4, 2016 00:56 IST

बुलडाणा जिल्ह्यातील येरळी व खिरोडा येथील पुलाचे ऑडिट करण्याची गरज.

सुहास वाघमारे नांदुरा (जि. बुलडाणा),दि. ३: बुलडाणा जिल्हय़ातील पूर्णा नदीवर सुमारे नव्वद वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी लोडबेअरिंग पद्धतीने बांधलेल्या येरळी व खिरोडा येथील पूल धोकादायक झाला आहे. महाड येथील दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर या पुलांचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे.पूर्णा नदीवरील येरळी येथील ब्रिटिशकालीन पुलाची निर्मिती इंग्रजांनी १९२६ मध्ये तर खिरोडा येथील याच नदीवरील पुलाचे बांधकाम १९३१ मध्ये लोडबेरिंग पद्धतीने करण्यात आले आहे. २00६ मध्ये आलेल्या महापुरामुळे येरळीच्या पुलाच्या दोन मोर्‍यांवरील स्लॅब वाहून गेल्याने पूल नादुरुस्त झाला होता. पुलाची डागडुजी केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. खिरोडा येथील पुलाचीही अशीच स्थिती आहे. या दोन्ही पुलांच्या बाजूला मागील सहा वर्षांपासून नवीन पुलांच्या कामाला प्रारंभ झाला. आज रोजी येरळीजवळील पुलाचे काँक्रिट वर्क पूर्ण झाले असून आजूबाजूचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले आहे. खिरोडा येथील फक्त पुलाचे कॉलम उभे आहेत. नाइलाज असल्याने प्रवाशांना या धोकादायक पुलांवरून वाहतूक करावी लागत आहे. पावसाळ्यात पूर्णा नदीच्या पुराचे पाणी पुलावरून आठ ते दहा फूट वाहते. यामुळे दोन ते तीन दिवस वाहतूक बंदच असते. पूर ओसरल्यानंतर प्रत्येक वेळी पुलाची स्थिती तपासून त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येते. येरळी येथील पुलाबाबत ब्रिटिश यंत्रणेचे पत्र !येरळीजवळील पूल दहा वर्षांपूर्वी नादुरुस्त झाला होता व त्यावरील दोन मोर्‍यावरील स्लॅब पुरात वाहून गेल्याने नवीन स्लॅब टाकण्यात आला; मात्र या पुलावर काही भागात भेगा पडल्या आहेत. या पुलाबाबत ब्रिटिशकालीन यंत्रणेचे पत्र सन २00८ मध्ये बांधकाम विभागाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर पुलांची तपासणी होणे गरजेचे आहे. "येरळी व खिरोडा येथील दोन्ही ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असून त्याबाबतची तपासणी करण्यात आली आहे. नवीन पुलांच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे."- एस.पी. थोटांगेकार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव.