शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी आणा अन् सात-बारा घेऊन जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:19 IST

हा अभिनव उपक्रम अकोला तहसील कार्यालयामार्फत येत्या १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

- संतोष येलकरलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषक व अकृषक जमिनीच्या सात-बारा फेरफारच्या नोंदी प्रलंबित राहू नयेत आणि सात-बारासाठी नागरिकांवर प्रतीक्षा करण्याची वेळ येऊ नये, यासाठी ‘खरेदी आणा अन् सात-बारा घेऊन जा’ हा अभिनव उपक्रम अकोला तहसील कार्यालयामार्फत येत्या १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. कृषक व अकृषक जमिनीच्या व्यवहारानंतर मालमत्ताधारकास सात-बारा फेरफारसाठी संबंधित तलाठ्यांकडे खरेदी दिल्यानंतर तलाठ्याकडून खरेदीदारास नोटीस दिली जाते. त्यानंतर तलाठ्याकडून फेरफारची नोंद प्रमाणित करण्यासाठी संबंधिंत मंडळ अधिकाऱ्याकडे पाठविली जाते आणि पंधरा दिवसांनंतर संबंधित मालमत्ताधारकास नवीन सात-बारा देण्याची पद्धत सध्या प्रचलित आहे; परंतु सात-बारा, फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे प्राप्त झालेल्या खरेदी प्रलंबित राहिल्यास मालमत्ताधारकांवर फेरफार नोंदीसह नवीन सात-बारासाठी महिना-दोन महिने प्रतीक्षा करण्याची वेळ येते. त्यामुळे कृषक व अकृषक जमिनीच्या फेरफार नोंदी आणि नवीन सात-बारा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘खरेदी आणा आणि सात-बारा घेऊन जा’ हा अभिनव उपक्रम अकोला तहसील कार्यालयामार्फत १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमात तहसील कार्यालयात खरेदी घेऊन येणाºया शेतकऱ्यांसह नागरिकांना त्यांच्या जमिनीची फेरफार नोंद घेऊन त्याच दिवशी नवीन सात-बारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मंडळ अधिकाºयांकडून फेरफार नोंद प्रमाणित करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘हेल्प डेस्क’द्वारे त्याच दिवशी संबंधित खरेदीदारास नवीन सात-बारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सात-बारा फेरफारच्या नोंदी प्रलंबित राहू नयेत आणि तातडीने नवीन सात-बारा उपलब्ध व्हावा, यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागAkolaअकोला