शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

नवरीच्या पाठवणीसाठी दुचाकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:07 IST

विवाहानंतर नवरी मुलगी विवाहानंतर नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी रवाना झाली.

मूर्तिजापूर : गतवर्षी साक्षगंध झाले आणि आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे २० एप्रिल रोजी विवाह ठरला; मात्र अचानक कोरोना विषाणूचे संकट आल्याने जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील हयातपूर कुरूम येथील मारोती संस्थान जय माँ चैतन्य शक्ती आत्मिक व आध्यात्मिक सेवा केंद्राच्यावतीने नियोजित विवाह २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. विवाहानंतर नवरी मुलगी विवाहानंतर नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी रवाना झाली. गत पंधरवड्यात तालुक्यात अशा प्रकारे पार पडलेला हा दुसरा विवाह आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील नागठाणा येथील बाळू जगन सोळंके यांची मुलगी स्नेहाचा विवाह, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा बुद्रूक येथील अजय महादेव चव्हाण यांचा मुलगा आनंद याच्याशी गतवर्षी २४ एप्रिल रोजी ठरला. यावर्षी २० एप्रिल ही विवाहाची तारीख आणि घटका निश्चित करण्यात आली; मात्र सद्यस्थितीत ‘लॉकडाउन’मुळे जमावबंदी असल्याने सगळे रीतिरिवाज बाजूला सारून अगदी साध्या पद्धतीने वैदिक रिवाजाप्रमाणे पाच लोकांच्या उपस्थितीत श्री मारोती संस्थान जय माँ चैतन्य शक्ती आत्मिक व आध्यात्मिक सेवा केंद्राचे संस्थापक गौरीशंकर महाराज, गौरीअम्मा यांच्यावतीने वर-वधूंचा लागणारा सर्व खर्च करून वैदिक पद्धतीने आदर्श विवाह सोहळा हयातपूर कुरूम येथे संपन्न झाला. विवाहासाठी नवरा मुलगा दुचाकीवरून आपल्या मोजक्याच नातेवाइकांसह लग्नमंडपी दाखल झाला. वधू पक्षाकडून आई, वडील व भाऊ उपस्थित होते. काही निवडक वºहाडी मंडळीची उपस्थिती होती. लग्नानंतर नववधू स्नेहा हिला नवरदेव चक्क आपल्या दुचाकीवरून आपल्या गावी घेऊन गेल्याने कुतूहल व्यक्त करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर