शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर वनरक्षक जेरबंद

By admin | Updated: January 29, 2015 00:45 IST

अकोला एसीबीची परतवाडा येथे कारवाई; अपघातग्रस्त कार सुपूर्दनाम्यावर देण्यासाठी मागितली होती एक लाखाची लाच.

अकोला - वन्य प्राणी अपघातप्रकरणात वन विभागाकडे जप्तीत असलेले वाहन सोडविण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाचेची मागणी करणारा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वनरक्षक दिनेश विनायक वाट याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ७0 हजार रुपयांची लाच घेताना परतवाडा येथून रंगेहात अटक केली. मोठय़ा साहेबांच्या नावावर ही रक्कम मागण्यात आली असून, यामध्ये आणखी काही अधिकार्‍यांचा समावेश आहे का, याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.तक्रारदार एम एच ३0 टीसी १४३ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने १९ जानेवारी रोजी परतवाड्याजवळील बहीरम येथे यात्रेसाठी जात असताना, त्याच्या कारची एका खांबाला धडक लागली. या अपघाताच्यावेळी बाजूलाच असलेले काही पोलीस कारजवळ आले आणि या कारने एका काळविटाला धडक दिल्याने काळविटाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कारने कोणत्याही काळविटाला धडक दिली नसल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले; मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी बहीरम येथील एका पोलीस चौकीमध्ये कार जमा करून परतवाडा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक वाट याला बोलविले आणि कार वन विभागाच्या जप्तीत दाखविली. तक्रारकर्त्याने कार सोडण्याची विनंती केली; मात्र सुपूर्दनाम्यावर कार सोडविण्यासाठी मोठय़ा साहेबांना एक लाख रुपये द्यावे लागतील, असे वाट याने सांगितले. तक्रारकर्त्याने एक लाख देण्यास नकार दिल्यानंतर ७0 हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. दरम्यान, तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ ते २७ जानेवारी या कालावधीत वाट याच्याविरुद्ध पंचासंमोर पडताळणी कारवाई केली असता, वाट याने मोठय़ा साहेबांकडून काम करून देण्यासाठी ७0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २८ जानेवारी रोजी दिनेश वाट याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.