शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर हेडकॉन्स्टेबल गजाआड

By admin | Updated: February 27, 2016 01:39 IST

जुने शहर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल.

अकोला: शिवसेना वसाहत येथील युवकाने दिलेल्या तक्रारीवर कारवाई टाळण्यासाठी तीन युवकांजवळून सहा हजार रुपयांची लाच घेणार्‍या जुने शहर पोलीस स्टेशनमधील एका हेडकॉन्स्टेबलला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात अटक केली. साहेबराव वानखडे असे पोलिसाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना वसाहत येथील रहिवासी सचिन अंबरते नामक युवक याच परिसरातील रहिवासी एका युवकाच्या दुचाकीमधील जानेवारी महिन्याच्या अखेरीस बॅटरी चोरत असताना एका महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे बाजूलाच उभ्या असलेल्या तीन युवकांनी सचिन अंबरते याला मारहाण केली होती. त्यामुळे अंबरते याने या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये करून तीनही युवकांवर कठोर कारवाईची मागणी केली होती; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले. त्यानंतर शिवसेना वसाहत परिसराचे बिट जमादार साहेबराव वानखडे याने सदर तक्रारीवर त्या तीनही युवकांशी संपर्क साधून तुमच्यावर कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच ही कारवाई टाळायची असेल तर तिघांनीही प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची मागणी केली; मात्र युवकांना लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी पोळा चौकातील पोलीस चौकीत सहा हजार रुपयांची लाच देवाण-घेवाण करण्याचे ठरले. यावेळी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख उत्तम जाधव यांच्या पथकानेही सापळा रचला. युवकांनी सहा हजार रुपयांची लाच साहेबराव वानखडे याच्या हातात देताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वानखडे याला लाच घेताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी वानखडे याच्याविरुद्ध तो कार्यरत असलेल्या जुने शहर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.