शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीतही लाचखोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST

अकोला : जगभर कोरोनाचे भीषण संकट गत वर्षापासून घोंगावत आहे. राज्यातही कोरोणाचे प्रमाण वाढले असतानाही, लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे ...

अकोला : जगभर कोरोनाचे भीषण संकट गत वर्षापासून घोंगावत आहे. राज्यातही कोरोणाचे प्रमाण वाढले असतानाही, लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अकोला जिल्ह्यात २०२० या वर्षात १८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली, तर २०२१ या वर्षातील पाच महिन्यांत चार लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे. यामध्ये महसूल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपन्या आणि इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे.

शासकीय कार्यालयात काम अडल्यानंतर, तसेच शासकीय कंत्राटदार व इतररांची बिल काढण्यासाठी प्रत्येक टेबलवर लाच मागितल्या जाते. त्यामुळे अशा लाचखोरावर कारवाई करण्यासाठी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहेत. एक वर्षापासून कोरोणाचे संकट असल्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज कमी प्रमाणात सुरू आहे, तर अनेकांची कामे अडलेली आहेत. त्यामुळे ही कामे करण्यासाठी लाच मागणाऱ्या चार जणांवर २०२१ या वर्षात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे.

कोणत्या वर्षात किती कारवाया

२०१८ - २३

२०१९ -१९

२०२० - १८

२०२१ - ०४

कोरोना काळात महसूलची वरकमाई जोरात

विभाग। कारवाया

महसूल। ०५

पोलीस। ०३

वनविभाग। ०१

वीज वितरण कंपन्या। ०२

नगरविकास। ०२

ग्रामविकास। ०३

अन्न व नागरी पुरवठा। ०१

बांधकाम। ०१

सहकार। ०१

इतर लोकसेवक ३

सर्वात जास्त कारवाया अकोला तालुक्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत अकोला तालुक्यात सर्वाधिक कारवाया केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, अकोला तालुक्यात ९ पेक्षा अधिक लाचखोरांना अटक करण्यात आली असून, त्या खालोखाल अकोट तालुक्यातील लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचे भीषण संकटात असतानाही लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे यावरून दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरुवातीपासून भीषण आहे. या वर्षात तर कोरोनाचा आलेख हा प्रचंड वाढलेला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही काही शासकीय अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षात चार जणांवर कारवाई केलेली आहे.

शरद मेमाने, उपअधीक्षक

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला