शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर प्रचार करणार्‍यांना ब्रेक

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

उमेदवार अडचणीत : सोशल मीडियावरील प्रचार निवडणूक खर्चाच्या कक्षेत

खामगाव : साडेतीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फेसबुक, व्हॉट्स अँप, ट्विटर, हाईक या माध्यमातून प्रचार केला; मात्र आता निवडणूक आयोगाने सोशल मीडियावरून प्रचार करणार्‍यांची गोची केली आहे. ज्या उमेदवाराची जाहिरात अथवा पेडन्यूज सोशल मीडियावर येईल त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात त्या जाहिरातीचा समावेश केल्या जाईल, असा निर्णय निवडणूक विभागाने घेतल्याने नेटकर्‍यांची दांडी उडाली आहे. जिल्ह्यात साडेतीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन विविध पक्षाच्या नेत्यांनी व संभाव्य उमेदवारांनी व्हॉट्स अँप फौज उभी केली आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांनी आपण पोहचू शकू, हा उद्देश होता; मात्र निवडणूक आयोगाने एका परिपत्रकातून व्हॉट्स अँप प्रचार करणार्‍यांना दणका दिला आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार व्हॉट्स अँप अथवा इतर कुठल्याही सोशल मीडियावर विना परवानगी जाहिरात कुठल्याही पक्षाला अथवा उमेदवाराला करता येणार नाही. सोशल मीडियावर ज्या उमेदवाराची जाहिरात दिसेल त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात सोशल मीडियावरील जाहिरातचे पैसे लावले जातील. या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील नेटकर्‍यांची गोची झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी आपल्या व्हॉट्स अँप प्रचारासाठी एक टीम उभी केली आहे. या टीममध्ये तंत्रज्ञानाची जाण असणारे कार्यकर्ते भरती करण्यात आले आहेत. हे कार्यकर्ते व्हॉट्स अँपवर ग्रुप बनवून काही क्षणात एखादी माहिती व्हॉट्स अँपवर तत्काळ टाकतात. याशिवाय उमेदवाराच्या जाहिरातीही मोठय़ा प्रमाणावर टाकण्यात येत असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनुभवयास मिळाले आहे. याबाबत अधिकच्या गाईडलाईन निवडणूक विभागाकडून लवकरच प्राप्त होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.