शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टय़ांतून होणार्‍या प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:49 IST

अकोला : जिल्हय़ातील अनेक महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री नोंद आहे. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देमहामार्गालगत वीटभट्टय़ा सुरूच प्रदूषण नियंत्रण कायदा कागदावरच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील अनेक महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री नोंद आहे. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. कायद्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्‍चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्टय़ांना मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे निर्मिती करता येईल, तसे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.  पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळीच अंमलबजावणीचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणार्‍या वीटभट्टय़ांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून माहिती मागविण्यात आली. माहिती मागवण्याच्या नादात अद्यापही वीटभट्टय़ांवर प्रदूषणासाठी कारवाईच झाली नसल्याची माहिती आहे. 

महामार्गालगत वीटभट्टय़ांची गर्दी कायद्यानुसार वीटभट्टय़ांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्हय़ातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्टय़ांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्टय़ा आहेत. त्यापैकी काहीच भट्टय़ांची माहिती महसूल विभागाकडे आहे. उर्वरित भट्टय़ा अनधिकृत असल्याचेच चित्र आहे. त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही, हे विशेष.