शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

निधी अभावी स्थापत्य अभियंत्यांच्या नियुक्तीला ‘ब्रेक’

By admin | Updated: February 14, 2015 01:32 IST

राज्यातील १५६ उमेदवार वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत.

मनोज भिवगडे/अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २0१३ साली घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी स्थापत्य सेवा परीक्षेतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील १५६ उत्तीर्ण उमेदवार सर्व सोपस्कार पार पाडूनही वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे एकाच वेळी तीन विभागासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील उतीर्ण उमेदवारांना सर्वाजनिक बांधकाम व जलसंपदा विभागातर्फे नियुक्ती देण्यात आली असताना, पाणी पुरवठा व स्वच्छा विभागातर्फे निधीचे कारण पुढे करीत उमेदवारांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २0१३ मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य सेवा परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २0१३ रोजी राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या चार केंद्रावर घेण्यात आली होती. यात साहाय्यक अभियंत्याचे (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ८0 , जलसंपदा विभागासाठी ७५९ आणि पाणीपुरवठा विभागासाठी १५८ पदांचा समावेश होता. मुख्य परीक्षा आटोपल्यानंतर २९ मार्च २0१४ रोजी लोकसेवा आयोगातर्फे निकाल घोषित करण्यात आला. गुणवत्ता यादीनुसार प्रत्येक विभागासाठी आवश्यक पदांएवढय़ा उतीर्ण उमेदवारांची शिफारस करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने उमेदवारांना नियुक्ती दिली. त्यानंतर जलसंपदा विभागातील उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न विधानसभेत गाजला. अखेर या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन्ही विभागातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असली तरी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मात्र निधी अभावी १५६ उमेदवारांना वर्ष उलटले तरी नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवले आहे.*मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविलेस्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वर्षभरापासून नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. लोकसेवा आयोगाने सर्व सोपस्कार उरकून पाणीपुरवठा विभागाकडे १५६ उमेदवारांची शिफारस केली. त्यामुळे आता पुढचे सोपस्कार या विभागाला पूर्ण करावयाचे होते. या विभागाकडे निवड झालेल्या उमेदवारांनी विचारणा केली असा त्यांना असामाधानकारक उत्तर मिळाले. त्यामुळे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या कार्यालयाचे उंबरठे उमेदवारांनी झिजविले. ३ फेब्रुवारी रोजी उमेदवारांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. *प्रधान सचिवांना दिले चौकशीचे आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे उतीर्ण उमेदवारांनी त्यांची कैफियत मांडली. आपले सरकार या संकेत स्थळाच्या माध्यमातूनही उतीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांची तक्रार शासनाकडे पाठविली; परंतु त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले नाही. याबाबत मंत्र्यांकडे विचारणा केली असता उमेदवारांच्या नियुक्तीबाबत कुठे अडचणी आल्यात याबाबत चौकशी करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.