शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रंग मिसळून ब्रॅन्डेड कंपन्यांच्या नावाने विदेशी दारूची निर्मिती!

By admin | Updated: June 30, 2017 01:04 IST

आरोपीस अटक: मध्य प्रदेशातून आणायचा बॉम्बे व्हिस्की, दारूच्या रिकाम्या बाटल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान परिसरातील सचिन हिरामण रोकडे याच्या घरातून पोलिसांनी बुधवारी रात्री १ लाख ६३ हजार रुपयांचा बनावट विदेशी दारूचा साठा जप्त केला. रोकडे याने महाराष्ट्रात बंदी असलेली मध्य प्रदेशातील बॉम्बे विस्की आणून आणि त्यात लाल रंग मिसळून ती दारू ब्रॅन्डेड कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा अवैध व्यवसाय घरीच सुरू केला होता; परंतु त्याचा हा व्यवसाय पोलिसांनी बुधवारी रात्री उघडकीस आणला. सचिन रोकडे हा घरातून फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या आईला ताब्यात घेतले होते. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून सचिन रोकडे हा बनावट दारू निर्मितीची माहिती घेऊन आला असून, काही महिन्यांपूर्वीच त्याने हा अवैध व्यवसाय सुरू केला आहे. मध्य प्रदेशातून दारू आणायची आणि ही दारू विविध ब्रॅन्डेड कंपनीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरायची. एका मशीनच्या साहाय्याने दारूच्या बाटल्या सीलबंद करायच्या. विदेशी दारू दर्शविण्यासाठी तो रासायनिक रंगाचा वापर करायचा. पोलिसांनी त्याच्या घरातून रंग आणि दारूच्या बाटल्या सीलबंद करण्याची मशीन जप्त केली. पोलिसांनी १ हजार ६०० हून अधिक खाली बॉटल, ७५० मि.ली.च्या २६० बॉटल किंमत ९३ हजार ६०० रुपये, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बॉम्बे स्पेशल व्हिस्की यामध्ये फेरबदल करून विकण्यात येणाऱ्या १८० मि.ली.च्या १६३ सीलबंद बॉटल किंमत २२ हजार ८२० रुपये, असा एकूण १ लाख १६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल त्याच्या घरातून जप्त केला. सचिन रोकडे याने शहरात कोणाला ही दारू विकली, तो मध्य प्रदेशातून कोणाकडून दारू, रिकाम्या बाटल्या आणायचा, याचा शोध खदान पोलीस घेणार आहेत. रोकडेला केली अटक ४बुधवारी रात्री पोलिसांनी छापा मारल्यावर आरोपी सचिन रोकडे हा घरातून फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या आईला ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी रोकडे याला खदान परिसरातून ठाणेदार गजानन शेळके, एएसआय गोपीलाल मावळे, किशोर सोनोने, सागर भारस्कर यांनी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.