शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : अकोल्याच्या गोपाल, अनंता, साद, हरिवंश, रोहणचा दमदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:31 IST

अकोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे ८८ वी वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशीच्या लढतींमध्ये अकोल्याच्या बॉक्सरांनी दमदार खेळप्रदर्शन करीत प्रतिस्पर्धींना धुळ चारली. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे बॉक्सर गोपाल होगे,अनंता चोपडे, साद सय्यद, हरिवंश टावरी तसेच अकोला शहराचा बॉक्सर रोहण पटेकर यांनी आपआपल्या गटात विजय ...

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे ८८ वी वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशीच्या लढतींमध्ये अकोल्याच्या बॉक्सरांनी दमदार खेळप्रदर्शन करीत प्रतिस्पर्धींना धुळ चारली. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे बॉक्सर गोपाल होगे,अनंता चोपडे, साद सय्यद, हरिवंश टावरी तसेच अकोला शहराचा बॉक्सर रोहण पटेकर यांनी आपआपल्या गटात विजय मिळवून स्पर्धेच्या दुसºया फेरीत प्रवेश केला. तर अकोल्याचा स्टार बॉक्सर अझहर अली याचे आव्हान संपुष्टात आले. अमिन मोहम्मद, श्यामल टोपलेही फारशी कामगिरी करू शकले नाहीत.४९ किलो वजन गटात क्रीडापीठाचा गोपाल होगे यांचा सामना सांगलीच्या तुषार पाटीलसोबत झाला. गोपालने गुणांच्या आधारावर लढत जिंकली. ५२ किलो वजनगटात क्रीडापीठाचा अनंता चोपडे याची लढत मुंबई उपनगरचा बीरू बिंड याच्यासोबत झाली. अनंताने अधिक गुणांची कमाई करीत बीरू चा पराभव केला. ५६ किलो वजनगटात क्रीडापीठाचा साद सय्यदने पिंपरी चिंचवडच्या सी.वनलालमहरू याला धुळ चारली. याच वजनगटात अकोला शहराचा स्टार बॉक्सर अझहर अली याला मुंबई शहराचा फय्याज खान याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासोबतच अझहरचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ६० किलो वजनगटात अकोला शहराचा श्यामल टोपलेला नागपूरच्या रितिक मेश्रामने पराभूत केले. यानंतर झालेल्या लढतीमध्ये क्रीडापीठाचा हरिवंश टावरी याने नाशिक शहराच्या प्रसाद शिवादे याला लोळविले. ६४ किलो वजनगटात अकोला शहराचा बॉक्सर रोहण पटेकर याने मुंबईच्या बिनोद पुन याला पराभूत केले. रोहणने कट-टू -कट खेळत लढतीच्या पहिल्याच फेरीत बिनोदवर जोरदार ठोसे मारले. बिनोद थकल्यामुळे पंचांनी लढत थांबविली.४९ किलो वजनगटात नागपूरचा लुमान शाहू, सोलापूरचा संतोष सागर, पुणेचा रोहण जगदाळे, जळगावचा सिद्धांत धिवरे, औरंगाबादचा उस्मान श्ोख, मुंबईचा आदिल सिंह, नंदूरबारचा योगेश माळी, ५२ किलो वजनगटात औरंगाबादचा विजय शेळके, वर्धाचा शुभम जुगनाके, लातूरचा प्रशांत खंडेलवाल, पुण्याचा गौरव गोसावी, पिंपरी चिंचवडचा अमरनाथ यादव, परभणीचा शहिद कुरेशी, पुण्याचा आशुतोष खोमणे, ५६ किलो वजनगटात जळगावचा अभिषेक भालेराव, नागपूरचा वीरेश बागडे, मुंबई उपनगरचा प्रिन्स श्रीवास्तव, पुण्याचा ऋषिकेश गौड, साताराचा आशुतोष भारती, औरंगाबादचा कैलास गुनसिंगे यांनी विजय मिळविला. उर्वरित लढती उशिरा रात्रीपर्यंत सुरू होत्या. 

 

टॅग्स :Akolaअकोलाboxingबॉक्सिंग