शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 20:09 IST

मूर्तिजापूर /कुरुम/ माना: माना येथून सिरसो येथे कर्तव्यावर  जाणार्‍या शिक्षकांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने  येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू  झाल्याची घटना १५ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजता  राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मलकापूर फाट्याजवळ घडली.

ठळक मुद्देदोन शिक्षकांचा जागीच मृत्यूमाना-सिरसो मार्गावर घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर /कुरुम/ माना: माना येथून सिरसो येथे कर्तव्यावर  जाणार्‍या शिक्षकांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने  येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू  झाल्याची घटना १५ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजता  राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मलकापूर फाट्याजवळ घडली.जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळा सिरसो येथे शिक्षक  म्हणून कार्यरत असलेले ऐसानोद्दीन जशीमोद्दीन ( ४५) रा.  माना, मोहसिन अहमद मोबिन अहमद (३८) रा. अंबाडा  जि. अमरावती ह.मु. माना हे दोघे एमएच ३७ एच ५४१५  क्रमांकाच्या दुचाकीने माना येथून सिरसो येथे कर्तव्यावर जात  असताना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मलकापूर  फाट्याजवळ मूर्तिजापूरकडून अमरावतीकडे जाणार्‍या डब्लू  बी २९ बी 0५४४ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाने त्याचा ट्रक  भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला  समोरून धडक दिली. यात दोन्ही शिक्षक गंभीर जखमी  झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ट्रक चालक ट्रक  सोडून घटनास्थळावरून पसार झाला. सदर दोन्ही मृतदेह  शवविच्छेदनाकरिता मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उ पजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, ऐसानोद्दीन  यांच्यावर माना येथे तर मोहसिन अहमद यांच्यावर अंबाडा,  जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  ऐसानोद्दीन यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले तर मोहसिन  अहमद यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा  आप्त परिवार आहे.याप्रकरणी पो.स्टे. माना येथे मो. मुस्ताक मो. ईब्राहिम रा.  माना यांच्या फिर्यादीवरून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध कलम  २७९, ३0४ अ भादंवि १८४ एम.व्ही. अँक्टनुसार गुन्हा  दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार  भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंदू  पाटील, हेकॉ. श्याम शर्मा, पोकॉ. नंदू टिकार, विनोद तायडे,  सचिन दुबे करीत आहेत.