शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप

By admin | Updated: January 9, 2016 02:40 IST

खामगाव न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन लादले होते मातृत्व.

खामगाव (बुलडाणा): अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्यावर मातृत्व लादणार्‍या दोन आरोपींना खामगाव न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खामगाव शहरातील रावण टेकडी भागात साडेतेरा वर्षाची मुलगी काका व आजीसोबत राहत होती. आरोपी व मुलीचे काका हे वाजंत्री वाजविण्याचे काम करीत होते. १२ ऑगस्ट २0१३ रोजी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, जवळपास वर्षभरापुर्वी एक दिवस मुलीचे काका जास्त दारू प्यायले होते. त्याचा फायदा घेत संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव कोद्री येथील आरोपी राजू सुखदेव वाकोडे (वय ३४) आणि गणेश गुलाब वानखडे (वय ४६) यांनी पीडित मुलीवर अत्याचार केला. काही दिवस हा प्रकार सुरूच होता. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. तिने आजीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर खामगाव येथे १२ ऑगस्ट २0१३ रोजी या प्रकरणाची तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही आरोपी तुरूंगातच होते. सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. डीएनए चाचणीमध्ये राजु वाकोडेपासून मुलीला गर्भ राहिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात माजी सरकारी वकील राजेश्‍वरी आळशी यांनी तसेच अतिरिक्त सरकारी वकील जे.एम. बोदडे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्य सरकारी वकील उदय आपटे यांनी सहकार्य केले. शुक्रवारी खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एम. अग्रवाल यांनी दोन्ही आरोपींना भादंवि कलम ३७६ अन्वये जन्मठेप, ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास आणखी १ वर्षे सक्तमजुरी, त्याचप्रमाणे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गतही जन्मठेप, ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षे सक्तमजुरी, तर भादंवि कलम ३२३, ५0६ अन्वये १ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.