शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर दगडफेक करणारे दोघे जेरबंद

By admin | Updated: July 20, 2016 01:31 IST

पोलिसांवर दगडफेक करणा-या दोन आरोपींना अटक; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी.

अकोला: हरिहरपेठेतील चांदखॉ प्लॉट येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दगडफेक करणार्‍या दोन आरोपींना जुने शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. साजिद राजा खान सलीम रजा खान व जावेद खान जाकीर खान अशी दोन आरोपींची नावे आहेत.चांदखॉ प्लॉट परिसरातील रहिवासी सुरेश नवलकार याने यथेच्छ मद्यप्राशन करून चांदखॉ प्लॉटमधील इच्छा चहाच्या टपरीवर आला. त्यानंतर काही जणांशी वाद घालून त्याने त्या ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य करीत परिसरातील नागरिकांनाही अश्लील शिवीगाळ केली. तो दारू प्यायला असल्याने नागरिकांनी त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनीही त्याची समजूत काढल्यानंतर हा वाद मिटविण्यात आला; मात्र काही वेळातच या परिसरातील समाजकंटकांनी या दारुड्याच्या वक्तव्याचा बाऊ करीत थेट पोलिसांवरच दगडफेक केली. या दगडफेकीत अख्तर आणि ठाकूर हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी काही समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये साजिद राजा खान सलीम रजा खान व जावेद खान जाकीर खान या दोघांचा समावेश आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध जुने शहर पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.