शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत दोन्ही चिमुकले पोलिसांच्या ताब्यात!

By admin | Updated: September 15, 2016 03:04 IST

विजयवाडा व बासरहून पोलीस पथक आज हिवरखेडला पोहोचणार.

हिवरखेड (जि. अकोला), दि. १४- शहरातील गोर्धावेस परिसरात राहणार्‍या विजय पवार (७) व वैभव भागडकर (८) या दोन्ही चिमुकल्यांचे शनिवार, १0 सप्टेंबर रोजी अज्ञात इसमाने अपहरण केले होते. यापैकी एक मुलगा तेलंगणातील बासरला तर दुसरा आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे सापडला.हिवरखेडच्या ठाणेदारांनी पाठविलेल्या पोलीस पथकाने १४ सप्टेंबर रोजी या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून हे पथक १५ सप्टेंबरला हिवरखेडला पोहोचणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर दोन मुलांपैकी वैभव भागडकर हा बासर रेल्वेस्टेशन (तेलंगणा) येथे रेल्वे पोलिसांना सापडला तर विजय पवार हा सात वर्षीय चिमुकला आंध्र प्रदेशातील विजयवाडा या शहरातील रेल्वेस्टेशनवर तेथील पोलिसांना मिळाला. विजयवाडा येथील चाइल्ड लाइन कोऑर्डिनरचे जेकब तसेच बासर रेल्वे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोहर यांनी या चिमुकल्या मुलांचे फोटो व माहिती व्हाट्सअँपवर पाहून अकोला पोलीस, हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्याशी संपर्क साधून चिमुकले हिवरखेड येथील असल्याची खात्री केली.त्यांच्याकडून मुले सापडल्याची माहिती मिळाल्याचे कळल्याने हिवरखेड पोलीस स्टेशनचे पथकातील राजेश भगत, श्रीकृष्ण गायकवाड व अमोल पवार हे मुलाचे पालक गजानन भागडकर व सुनील पवार यांच्यासमवेत बासर व विजयवाडा येथे गेले.तेथे त्यांनी १४ सप्टेंबरच्या संध्याकाळी ६ वाजता विजय पवार (७) व वैभव भागडकर (८) या चिमुकल्यांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी दिली.