शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव मंजूत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: November 10, 2014 01:09 IST

१५ दिवसांपासून पाणीपुरवठाच नाही.

बोरगाव मंजू (अकोला): महान धरणातील जलसाठय़ात झालेली घट व स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने बोरगाव मंजू येथील ग्रामस्थांना ऐन हिवाळय़ात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. गत १५ दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे गावकर्‍यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.बोरगाव मंजूसह परिसरातील ६४ गावांना खांबोरा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, महान धरणातील जलसाठा कमी झाल्याने तो अकोला शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महान धरणातून खांबोरा योजनेसाठी सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या ६४ गावांना आता दगडपारवा धरणातील मृत साठा, दोनदचा डोह व सुकळी नंदापूर येथील कूपनलिका या ठिकाणांहून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचे हे स्रोत र्मयादित असल्यामुळे या ६४ गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. बोरगाव मंजूसह ६४ गावांना १५ ते २0 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गावातील हातपंप नादुरुस्त असल्यामुळे गावकर्‍यांना पाण्यासाठी दोन किमीपर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. लोकांवर ऐन हिवाळय़ात पाणी विकत घेण्याची पाळी आली आहे.