शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोरगावात बाटली उभीच राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 17:21 IST

बोरगाव मंजू (जि. अकोला): बोरगाव मंजू येथील दारूची दोन दुकाने कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी महिलांच्या लढ्याला अखेर अपयश आले. येथील दारुची दोन्ही दुकाने बंद व्हावी या महिलांच्या निवेदनातील मागणीनुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार, १० सप्टेंबर रोजी महिलांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये दुकान सुरु ठेवण्याच्या बाजूने १५८ मते पडली, तर दुकान बंद ...

ठळक मुद्देदोन्ही दारु दुकानांना अभय आडव्या बाटलीसाठी कमी पडली मते

बोरगाव मंजू (जि. अकोला): बोरगाव मंजू येथील दारूची दोन दुकाने कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी महिलांच्या लढ्याला अखेर अपयश आले. येथील दारुची दोन्ही दुकाने बंद व्हावी या महिलांच्या निवेदनातील मागणीनुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार, १० सप्टेंबर रोजी महिलांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये दुकान सुरु ठेवण्याच्या बाजूने १५८ मते पडली, तर दुकान बंद करावे या बाजूने २३६३ मते पडली; परंतु दुकान कायमस्वरुपी बंद करण्यासाठी आवश्यक असलेला २६१६ चा आकडा गाठू न शकल्याने महिलांचा दारु बंदी विरुद्धचा हा लढा अपयशी ठरला.बोरगाव मंजू शहरात १ एप्रिलपासून दारूची दुकाने बंद होती. त्यानंतर संबंधित विभागाने शहरातील बंद दुकाने स्थानांतर करून नव्याने सुरू केली होती. त्यावर गावातील दारू दुकाने कायम बंद झाली पाहिजे, त्यासाठी गाव दारूबंदी महिला व पुरुष संघर्ष समितीने प्रशासनाला निवेदन दिले होते.दरम्यान, महिलांच्या प्राप्त निवेदनावरील २५ टक्के स्वाक्षरीची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये गावातील महिलांचा पुढाकार लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्यावतीने येत्या १० सप्टेंबर रोजी दारूबंदीसाठी निवडणूक घेण्यात आली. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत २६१६ महिलांनी मतदान केले. दुपारी ४ वाजतानंतर निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये उभ्या बाटलीला १५८, आडव्या बाटलीला २३६३ मते पडली. यापैकी ९५ मते बाद ठरली. दुकान कायमस्वरुपी बंद करण्यासाठी गावातील एकून महिला मतदारांपैकी २८२२ महिलांची मते असणे गरजेचे होते. परंतु, तेवढे मतदान न झाल्यामुळे गावातील दारुची दोन्ही दुकाने सुरु राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक प्रक्रिया पार करण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने मोलाची भूमिका बजावली.