शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

लग्न सराईसाठी महापालिकेच्या शाळांची ‘बुकिंग’;  शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:07 IST

अकोला : महापालिकेच्या शाळांमधील शालेय कामकाज ३० एप्रिल रोजी आटोपताच काही शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न सराईसाठी मनपाच्या शाळांची ‘बुकिंग’ सुरू केली आहे.

ठळक मुद्देस्लम एरियातील शाळा परस्पर भाड्याने देण्यासाठी काही मुख्याध्यापक सरसावल्याची माहिती समोर आली आहे.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर न देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकाराची मनपाच्या शिक्षण विभागाला खबरबात नसेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अकोला : महापालिकेच्या शाळांमधील शालेय कामकाज ३० एप्रिल रोजी आटोपताच काही शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न सराईसाठी मनपाच्या शाळांची ‘बुकिंग’ सुरू केली आहे. लग्न समारंभ असो वा इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर देता येत नसताना, स्लम एरियातील शाळा परस्पर भाड्याने देण्यासाठी काही मुख्याध्यापक सरसावल्याची माहिती समोर आली आहे.चार वर्षांपूर्वी लग्न समारंभ असो वा शुभ कार्यासाठी महापालिकेच्या शाळा सर्रासपणे भाडेतत्त्वावर दिल्या जात होत्या. त्याबदल्यात संबंधित आयोजकांना नाममात्र चार ते पाच हजार रुपये शुल्क आकारल्या जात होते. संबंधित शाळेतील सहा ते सात वर्ग खोल्या, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा तसेच मंडपासाठी खुल्या मैदानाची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे गरजू नागरिक मनपा शाळेला पसंती देत असल्याचे चित्र होते. परंतु, मनपाला मिळालेल्या अत्यल्प शुल्काच्या बदल्यात वर्ग खोल्यांसह परिसराची स्वच्छता राखली जात नसल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले. शाळेतील विद्युत व्यवस्थेसह पाण्याचा बेसुमार वापर, वर्ग खोलीतील भिंतींवर नसत्या उठाठेवी करणे, परिसरात अस्वच्छता पसरविणे, आवारभिंतीचे नुकसान करणे तसेच दिवाळीच्या सुट्यांमध्ये सुद्धा शाळा भाडेतत्त्वावर मिळवण्यासाठी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करणे आदी प्रकार होत असल्यामुळे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर न देण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन आयुक्त लहाने यांची बदली होताच व शिक्षण विभागाचा कारभार हवेत सुरू असल्याचे निदर्शनास येताच, काही शाळांमधील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांनी लग्न समारंभासाठी शाळांची आगाऊ ‘बुकिंग’ सुरू केल्याची माहिती आहे. या प्रकाराची मनपाच्या शिक्षण विभागाला खबरबात नसेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.महापालिकेचा आदेश बासनातमनपा शाळेत पार पडणाºया कार्यक्रमांमुळे इमारतींचे व शाळा परिसराचे प्रचंड नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी १९ नोव्हेंबर २०१६ रोजी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर न देण्याचा आदेश जारी केला. हा आदेश काही मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापन समित्यांनी बासनात गुंडाळून ठेवल्याचे चित्र आहे. या प्रकरणी शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एजंटमार्फत बुकिंगमनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर देण्यात प्रामुख्याने उर्दू शाळा अग्रेसर असल्याचे चित्र आहे. यामध्ये नायगाव, अकोट फैल, देशमुख फैल, तार फैल, लक्कडगंज, माळीपुरा, सिंधी कॅम्प, खदान, रामदासपेठ, ताजनापेठ, भांडपुरा आदी परिसरातील शाळांमध्ये उन्हाळ््याच्या सुट्यात सर्रास कार्यक्रमांची रेलचेल राहत होती. संबंधित शाळा भाडेतत्त्वावर देताना मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीला अडचण ठरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली असून, शाळेची नोंदणी करण्यासाठी एजंटची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. कार्यक्रम कोणत्याही अडथळ््याविना पार पाडण्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांवर सोपविण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका