शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बशोधक, नाशक पथकाकडून रेल्वे रुळाची तपासणी!

By admin | Updated: May 27, 2017 00:48 IST

माना परिसरात पाहणी; डॉग स्कॉडही कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून शुक्रवारी माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माना ते कुरूम रेल्वे रुळावर तपासणी करण्यात आली. यासोबतच डॉग स्कॉडकडूनही या परिसरातील रेल्वे रुळाची पाहणी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकार यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी करण्यात आली असून, सदर तपासणी घातपाताच्या संशयावरून करण्यात आली.अकोला शहरात झालेला सिलिंडरचा स्फोट, त्यानंतर बार्शीटाकळी तालुक्यात रेल्वे रुळावर बॉम्ब ठेवून रेल्वे रूळ उडविण्याचा कट उधळण्यात आला होता. या दृष्टीने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माना ते कुरूम या २० किलोमीटर परिसरात रेल्वे रुळाची तपासणी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर घातपाताच्या संशयावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकार आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून ही तपासणी करण्यात आली. रेल्वे रुळावरून काही लोखंडी तार जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ही तपासणी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय श्रीकृष्ण पाटील, नंदकिशोर टिकार, पोलीस कर्मचारी पवार, सचिन कुलट, दुबे आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथकाचे खान, शेख यांनी केली. या तपासणीत डॉग स्कॉडमधील ‘टायगर’ नामक श्वानही दाखल होता.