शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून रेल्वे स्टेशनवर तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 02:13 IST

रेल्वे रुळाची केली पाहणी; वाहनतळ आणि परिसरात झडती.

अकोला, दि. १0- रेल्वे स्टेशन परिसरातील अकोट फैल पुलानजीक रेल्वे रुळावर एका रेल्वे इंजीनमधील अग्निरोधक यंत्र काढून फेकल्याने तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेला तीन दिवसांचा कालावधी होत नाही तोच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्‍वान पथकाद्वारे शुक्रवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली. यावेळी रामदास पेठ पोलिसांद्वारेही स्टेशन परिसरातील वाहनतळ आणि रेल्वे रुळावर झडती घेण्यात आली.रेल्वे स्टेशन परिसर तसेच वाहनतळ आणि रेल्वे रुळावरून अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने बॉम्ब शोधक व नाशक पथक, रामदास पेठ पोलीस आणि श्‍वान पथकाद्वारे तब्बल तीन तास झाडाझडती घेण्यात आली. वाहन तळावरील सुमारे ५00 वर दुचाक्यांची तपासणी केल्यानंतर रेल्वे रुळावर अकोट फैल पुलापर्यंत तसेच न्यू तापडिया नगर परिसरातील रेल्वे रुळावर ही तपासणी करण्यात आली. रेल्वे रुळाची सूक्ष्मरीत्या तपासणी करीत काही साहित्य तसेच वस्तू ठेवण्यात आली का, याचीही तपासणी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने केली. रेल्वे स्टेशनवरील पायर्‍यांखाली श्‍वान पथकाद्वारे कसून तपासणी केल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या यंत्राद्वारे या ठिकाणी झडती घेण्यात आली. लखनऊ येथे एका दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर तपास यंत्रणा कामाला लागल्या असून, याच पृष्ठभूमीवर अकोल्यातील पोलीस यंत्रणेद्वारे रेल्वे स्टेशन परिसर तसेच रेल्वे रुळावर झाडाझडती घेण्यात आली.    रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सावकार यांनी रेल्वे स्टेशनसमोरील चौक ते वाहनतळ, रेल्वे स्टेशन परिसर आणि रुळावर तपासणी करण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला आवश्यक त्या सूचना केल्या. रेल्वे रुळावरील काही संशयास्पद वस्तू तसेच कापडही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्‍वान पथक आणि रामदास पेठ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ही तपासणी केली. रेल्वे स्टेशन परिसर, फलाट क्रमांक, वाहनतळ आणि रेल्वे रुळासह परिसरातील विविध कानाकोपर्‍यात ही तपासणी करण्यात आली. रेल्वे स्टेशनवर गत काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारानंतर ही तपासणी करण्यात आली आहे.- प्रकाश सावकारपोलीस निरीक्षक, रामदास पेठ पोलीस स्टेशन, अकोला.