शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:01 IST

नियमांना डावलून प्रॅक्टिस करणारे बोगस डॉक्टर लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे वास्तव गत काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवायांमधून उघड झाले आहे.

- प्रवीण खेतेअकोला : मेडिकल हब म्हणून अकोला जिल्हा नावारूपाला येत आहे; परंतु येथे वैध पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणे, पदवी एका पॅथीची, तर प्रॅक्टिस दुसऱ्या पॅथीची, तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशन अ‍ॅक्ट (एमपीटी)नुसार नोंदणी न करता प्रॅक्टिस करणाºया बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे वास्तव समोर आले आहे.समाजात डॉक्टरी पेशाला दैवत मानले जाते; परंतु पैशाच्या लोभापोटी काही लोक चुकीच्या पद्धतीने, तसेच नियमांना डावलून प्रॅक्टिस करणारे बोगस डॉक्टर लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे वास्तव गत काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवायांमधून उघड झाले आहे. यापूर्वी मे ते जून २०१८ या कालावधीत आरोग्य विभागाच्या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील दवाखाने व रुग्णालयांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशन अ‍ॅक्टनुसार महाराष्ट्रात प्रॅक्टिससाठी नोंदणी न करणारे डॉक्टर आढळून आले होते. यानंतरही अनेक डॉक्टर नियमांना डावलून जिल्ह्यात प्रॅक्टिस करत असून, रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने डिग्री एका पॅथीची, तर प्रॅक्टिस दुसºया पॅथीची करणाºया डॉक्टरांची संख्या जास्त आहे. शिवाय, इतर राज्यातून डॉक्टरची पदवी मिळवून नियमबाह्य जिल्ह्यात प्रॅक्टिस करत असल्याचीही माहिती आहे. हा प्रकार ग्रामीण भागात सर्रास सुरू असून, विशेष पथकाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.बोगस डॉक्टर विशेष पथकाच्या रडारवरजिल्ह्यातील पुंडा येथील बोगस डॉक्टरांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पथक सक्रिय झाले. पथकाकडे आलेल्या तक्रारीनुसार, आणखी दोन बोगस डॉक्टर पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तक्रारीची प्रतीक्षाजिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमांना डावलून चुकीच्या पद्धतीने रुग्णांवर उपचार होत आहेत. शहरी भागात हा प्रकार उघडपणे सुरू आहे; पण त्यांच्या विरुद्ध तक्रार नाही. अशा डॉक्टरांवर कारवाईसाठी पथकाला तक्रारीची प्रतीक्षा करावी लागत आहे.नियमांचे उल्लंघन करून प्रॅक्टिस करणाºया, तसेच ज्यांच्याकडे वैध पदवी नाही अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल. काही दिवसांपूर्वी पुंडा येथील एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून, अशीच कारवाई इतरही बोगस डॉक्टरांवर करणार आहोत.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.

 

टॅग्स :Akolaअकोलाdoctorडॉक्टर