शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटी कापूस बियाण्यांचा धोका !

By admin | Updated: May 6, 2017 02:44 IST

शेतक-यांनी सावध राहण्याची गरज

राजरत्न सिरसाट अकोला : बीटी बियाण्यात तणनाशक तंत्रज्ञान असल्याचे भासवून सर्रास बोगस बीटी कापसाचे बियाणे गत दोन वर्षापासून शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे. यावर्षीही हे बोगस बियाणे वर्‍हाडात दाखल झाले आहे. यावर्षी कापसाचा पेरणी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने इतरही चार नावाने बोगस बीटी बाजारात येण्यार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.या खरीप हंगामात कापसाचा पेरा वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे चांगल्या व भरघोस उत्पादनासाठी शेतकर्‍यांचा कल बीटी बियाणे खरेदी करण्यावर राहील; परंतु यावर्षीही बोगस वाण शेतकर्‍यांना माथी मारले जाणार असल्याचे जाणकारांच्या वर्तुळात बोलले जात आहे. हे बियाणे अधिकृत नसून, या बियाण्यांना विकण्याची शासनाने परवानगी दिलेली नाही.या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नाही. असे असताना या बीटीची विदर्भात दोन-चार वर्षांपासून सर्रास विक्री होत आहे. गत वर्षी कृषी विभागाने काही जणांवर थातूरमातूर कारवाई केली. अकोला जिल्हयासह वर्‍हाडातील पाचही जिल्हयात बोगस बियाणे व खते आढळून आली. यापृष्ठभूमीवर कृषी विभाग कोणती दक्षता घेतो याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. शेतकर्‍यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा! कृषी विभाग बोगस बीटी विक्रेत्यांच्या मागावर आहे; परंतु शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल न चुकता घेणे गरजेचे आहे. कृषिसेवा केंद्रधारक पावती देण्यास नकार देत असेल, तर शेतकर्‍यांनी १८00२३-३४000 या क्रमांकावर संपर्क साधावा.यावर्षी बोगस बीटी बियाण्यांच्या विक्रीवर आतापासूनच पाळत ठेवण्यात येत असून, बीटीची जेथे विक्री होत असेल, तेथे कृषी विभागाचा एक कर्मचारी पहारा देणार आहे. बीटी बियाण्याची संपूर्ण आकडेवारी ठेवली जाणार असून, अमरावती विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. - एस.आर. सरदार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.