शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Akola: ‘एसीबी’च्या तावडीतून मंडळ अधिकारी निसटला, अमरावती ‘एसीबी’ची अकाेल्यात शाेधाशाेध

By आशीष गावंडे | Updated: January 18, 2024 21:33 IST

Akola News: तहसीलदारांनी तक्रारकर्त्याच्या नावावर झालेल्या शेत कुळाची अभिलेखावर नाेंद घेण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या शेत मालकीच्या वादात प्रकरणातील गैरअर्जदाराचा अर्ज किंवा त्याबाबतचा आदेश आल्यास त्याची सातबा-यावर नोंद न करण्यासाठी ३० हजार रुपयांपैकी २० हजार रुपये लाच स्वीकारणारा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी ‘एसीबी’च्या तावडीतून निसटल्याचा धक्कादायक प्रकार १७ जानेवारी राेजी समाेर आला.

- आशिष गावंडे अकाेला - तहसीलदारांनी तक्रारकर्त्याच्या नावावर झालेल्या शेत कुळाची अभिलेखावर नाेंद घेण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या शेत मालकीच्या वादात प्रकरणातील गैरअर्जदाराचा अर्ज किंवा त्याबाबतचा आदेश आल्यास त्याची सातबा-यावर नोंद न करण्यासाठी ३० हजार रुपयांपैकी २० हजार रुपये लाच स्वीकारणारा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी ‘एसीबी’च्या तावडीतून निसटल्याचा धक्कादायक प्रकार १७ जानेवारी राेजी समाेर आला. याप्रकरणी अमरावती येथील ‘एसीबी’च्या चमूकडून शाेधाशाेध सुरु असून स्थानिक विभागातील वरिष्ठ ‘नाॅटरिचेबल’ झाले आहेत. 

तहसील विभागात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याने तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतरही तक्रारकर्त्याच्या नावावर झालेल्या शेत कुळाची अभिलेखावर नाेंद घेण्यासाठी टाळाटाळ सुरु केली हाेती. याप्रकरणी नाेंद घेण्यासाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्याने तक्रारकर्त्याकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारकर्त्याने अकाेलास्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार न करता थेट अमरावती येथील ‘एसीबी’कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यावर ‘एसीबी’च्या पथकाने खातरजमा केली असता, मंडळ अधिकाऱ्याने पहिल्या टप्प्यात २० हजार रुपयांची मागणी केली. प्राप्त तक्रारीनुसार १७ जानेवारी राेजी अमरावती येथून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांदेकर चाैकातील रसिक अॅटोमोबाईल दुकानच्या बाजूला सापळा रचला. परंतु लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या मंडळ अधिकाऱ्याला कारवाइची भनक लागताच त्याने पळ काढल्याचा प्रकार समाेर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी सीटी काेतवाली पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली असून ‘एसीबी’पथकाकडून मंडळ अधिकाऱ्याचा शाेध घेतला जात आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAkolaअकोला