शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उमेदीपुढे अंधत्वही झुकले!

By admin | Updated: August 10, 2014 18:29 IST

दोघा भावांनी नियतीपुढे हार न पत्करता अंधकारमय जीवनात आशेचा किरण शोधला आहे.

उमेदीपुढे अंधत्वही झुकले! ब्रह्मनंद जाधव ल्ल मेहकर (जि. बुलडाणा) बालवयातच अंधत्व आलेल्या दोघा भावांनी नियतीपुढे हार न पत्करता अंधकारमय जीवनात आशेचा किरण शोधला आहे. त्यांची धडपड आणि यातून त्यांनी उभा केलेला लघुउद्योग सर्वांंसाठीच प्रेरणादायी आहे. मेहकर येथील जितेंद्र भास्कर मिनासे आणि संजय भास्कर मिनासे या भावंडांची दृष्टी वयाच्या अनुक्रमे १४व्या व १५व्या वर्षी अचानक अधू झाली. पालकांनी दोघांवरील उपचारासाठी शक्य ती सर्व धावपळ केली; मात्र दुर्दैवाने औषधोपचारानंतरही या भावंडांना पूर्णत: अंधत्व आले. वयाच्या पंधरा वर्षांपर्यंंत जग पाहिल्यानंतर आलेले अंधत्व हे कुणाचेही उमेद हरविणारेच होते; मात्र या भावंडांनी खचून न जाता वडिलांना पशुखाद्य व धान्य विक्रीच्या व्यवसायात मदत करणे सुरू केले. दोघांनीही इयत्ता दहावीची परीक्षा लेखनिकाच्या मदतीने उत्तीर्ण केली. त्यानंतर जितेंद्रने वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेतली, तर संजयने शालेय साहित्य विक्रीचे दुकान थाटले. अंधत्वावर मात करून दोघाही भावांनी व्यापारात जम बसविला. त्यांनी पाणी साठवण्याच्या टाक्यांच्या निर्मितीचा लघुउद्योग मेहकरमध्ये सुरू केला. त्यांचे उत्पादन विदर्भासह मराठवाड्यातही जात आहे. आकारावरून ओळखतात पैसे : जितेंद्र व संजय मिनासे हे अंध असले तरी, व्यापार करताना येणार्‍या अडचणींवर त्यांनी लिलया मात केली. पैशाच्या आकारावरून ते किती रुपये आहेत, हे ते सहज ओळखतात. पैशावर त्यांचा हात एवढा बसला आहे की, कितीही मोठी रक्कम ते अचूक मोजतात.

** अनेकांना दिला रोजगार

अंध बंधूंनी पाण्याच्या टाक्यांच्या निर्मितीचा लघुउद्योग सुरू करून, त्याद्वारे अनेकांना रोजगार मिळवून दिला. या उद्योगासाठी त्यांनी कोणतीही शासकीय मदत घेतली नाही!