शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने खवळले पित्त

By admin | Updated: March 16, 2017 02:42 IST

गोदामातील संपूर्ण तुरीची एफएक्यू तपासणी करण्याची प्रकाश मानकर यांची मागणी.

अकोला, दि. १५-नाफेडच्या वतीने एजंट म्हणून मार्के टिंग फेडरेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तूर खरेदीतील वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने संबंधितांचे चांगलेच पित्त खवळले आहे. त्यापासून परावृत्त करण्यासाठीच फौजदारी तक्रार दुसर्‍या दिवशी करण्यात आली. या दबावाचा काहीच फरक पडणार नाही. आता शासनाने खरेदी केलेल्या गोदामातील संपूर्ण तुरीची एफएक्यू तपासणी करण्याची मागणी लावून धरू, असे भारत कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या वर्षी बाजारात तुरीला आठ ते दहा हजार रुपये भाव होते. यावर्षी ते ३५00 रुपयांपर्यंंंत खाली आले. शेतकर्‍यांची लूट सुरू असताना शासनाने हमीभावाने तूर खरेदी सुरू केली. त्यातही खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर मागे ठेवत व्यापार्‍यांचीच तूर प्राधान्याने घेण्याचा सपाटा खरेदी केंद्रावर सुरू करण्यात आला. सोबतच शेतकर्‍यांची तूर २0-२0 दिवस केंद्रावर ठेवण्यात आली. त्यातून शेतकर्‍यांना चांगलाच आर्थिक फटका बसत होता. त्यानंतरही तूर गुणवत्तेची नाही, या कारणाने वाहने परत करण्याचा उद्दामपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर सुरू होता. याबाबतची माहिती शेतकर्‍यांनी दिल्यामुळे तूर खरेदी केंद्रावर धाव घेतली, त्यावेळी खरेदी बंद होती. केंद्रावर जाताच जिल्हा मार्के टिंग अधिकारी वाजपेयी यांनी दुपारी १२.३0 वाजतानंतर खरेदी सुरू केली. त्याचवेळी वाजपेयी यांना शेतकर्‍यांना परत का पाठविता, अशी विचारणा केली. त्यांनी गुणवत्तेचा मुद्दा मांडला. त्यावर गोदामात खरेदी केलेली सर्वच तूर एफएक्यू दर्जाची आहे का, याबाबतही गोलमाल उत्तर त्यांनी दिले. त्या दिवशी शेतकर्‍यांना समजावून प्रकरण शांत केले; मात्र दुसर्‍या दिवशी सायंकाळी कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार वाजपेयी यांनी केली. हा प्रकार शेतकर्‍यांची मुस्कटदाबी करण्यासाठी केल्याचेही मानकर म्हणाले. उशिराने तक्रारीमागे वेगळेच कारणमार्के टिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी एक दिवस उशिराने तक्रार केली. हा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती व्यापार्‍यांनी तूर खरेदी केली, त्यांनी कोणत्या भावाने, कोठे विकली, याबाबतची माहिती मागितली. तसेच तूर विक्री करणार्‍या शेतकरी याद्या, त्यांनी विक्री केलेली तूर यासंदर्भातील माहितीही मागितली. त्याचा अर्ज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनाही दिला. त्यानंतर सायंकाळीच गुन्हे दाखल झाल्याने यामागे कुटिल डाव असल्याचा आरोपही मानकर यांनी केला. यावेळी कृषक समाजाचे कार्याध्यक्ष राजकुमार भट्टड, शेषराव पाटील व गोविंद पाटील उपस्थित होते.