शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बालकल्याण योजनेतील सेवानवृत्तांच्या जीवनात अंधकार

By admin | Updated: February 25, 2016 01:34 IST

जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर, सहा महिन्यांपासून नवृत्ती वेतनच नाही.

शिखरचंद बागरेचा/वाशिममहाराष्ट्र राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड अंतर्गत असलेल्या कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानवृत्त कर्मचार्‍यांना मागील सहा महिन्यांपासून नवृत्ती वेतन न मिळाल्यामुळे जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कुटुंब बालकल्याण योजनेतील सर्व सेवानवृत्तांचे जीवन अंधकारमय झाले आहे.राज्यभरातील सुमारे वीस लाख कर्मचारी व नवृत्ती वेतनधारक शासकीय अनुदानाच्या माध्यमातून पाचवा व सहाव्या वेतनाचा पुरेपूर लाभ घेत असून, सातव्या वेतनाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र शासकीय योजनेत प्रामाणिकपणे दीर्घ सेवा देणार्‍या कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानवृत्त कर्मचार्‍यांना त्यांच्या न्याय्य हक्कापासून शासन वंचितच ठेवत आहे. तसेच पाचवा, सहावा व सातवा वेतन तर सोडाच सहा महिने उलटले तरीही त्यांना अद्याप नवृत्ती वेतन अदा करण्यात आले नाही. त्यामुळे केवळ ३00 ते ३५0 च्या संख्येत असलेल्या या नवृत्त कर्मचार्‍यांवर उपासमारीची पाळी आली आहे. अनेक जण उपासमारीचे बळी ठरून मृत्युमुखी पडले आहेत. यावरून राज्यसरकार, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या संवेदना बोथट झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र समाज कल्याण बोर्ड अंतर्गत संपूर्ण राज्यात ३६ कुटुंब व बालकल्याण योजना राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कार्यरत होत्या. या कार्यालयातील केवळ ३00 कर्मचारी सेवानवृत्त आहेत. ७0 ते ८५ वष्रे वयोगटातील या कर्मचार्‍यांमध्ये ९0 टक्के महिला भगिनींची संख्या आहे. कुटुंब व बालकल्याण योजनेत त्याकाळी तुटपुंज्या वेतनावर काम करून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात प्रामाणिकपणे व प्रभावीपणे राबवित होत्या. या कर्मचार्‍यांना शासनाने पाचवा वेतन तब्बल १२ वष्रे उशिराने तर सहावा वेतन सहा वष्रे उशिराने लागू करून आपला दुटप्पीपणा दाखवून दिला. शासनाच्या या धोरणामुळे सातवा वेतन आयोग लागू होईल की नाही, याबाबत नवृत्त कर्मचारी साशंक आहेत. शासनाचे गलेलठ्ठ वेतन घेणारे शासकीय कर्मचारी, तसेच मोठय़ा प्रमाणात मानधन घेणारे मंत्री महोदय व आमदार या लोकप्रतिनिधींना कधी पाझर फुटेल, अशी आशा कुटुंब बालकल्याण योजनेचे सेवानवृत्त कर्मचारी बाळगून आहेत.