शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रीक थोपवेल सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजार

By admin | Updated: December 22, 2014 23:30 IST

स्वस्त धान्य दुकाने होणार ऑनलाईन, शिधापत्रिका होणार संगणीकृत.

वाशिम- सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजार थोपविण्यासाठी सरसावलेल्या अन्न व पुरवठा विभागाने आता राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमॅट्रीक प्रणाली लावण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असुन त्यासाठी स्वस्त धान्य दुकाने ऑनलाइन केली जाणार आहेत. संगणकीकृत यंत्रणेद्वारे ग्राहकांची, तसेच धान्य उचलल्याची माहितीही अपडेट होणार आहे. शिवाय ह्यथम्ब इम्प्रेशनह्ण तथा छायाचित्र काढल्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य देण्यात येणार नाही. राज्यातील गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण प्रणाली विकसीत केली आहे. मात्र, झारीतील शुक्राचार्यांमुळे आजमितीला या प्रणालीमध्ये काळाबाजार करणार्‍यांचेच वर्चस्व वाढले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत लाभार्थ्यांच्या हक्काचे धान्य परस्पर लाटणारी यंत्रणा उभी झाल्यामुळे खर्‍या गरजूंपयर्ंत हे धान्य पोचत नाही. अनेक स्वस्त धान्य दुकानदार गरीबांच्या वाट्याचे हे धान्य परस्पर खासगी दुकानांमध्ये विकतात. याबाबत कुणी ओरड केली तरी, त्याचा आवाज दाबण्याचे कसब या धान्य माफियांना चांगल्याप्रकारे अवगत झालेले आहे. प्रत्यक्षात धान्य काळाबाजारात विकले जात असले तरी, कागदावर मात्र ग्राहकांनाच विकल्याची नोंद करण्यात येते. तशा पावत्याही तयार करण्यात येतात. कागदोपत्री ह्यरंगरंगोटीह्ण केल्याने पुरवठा विभागाच्या स्थानिक दप्तरी सुद्धा सर्व काही आलबेल असते.