शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नोटांचा काळाबाजार; एक रुपयाच्या नोटेची किंमत ३0 रुपये

By admin | Updated: December 29, 2015 02:20 IST

चिल्लरच्या नावावर ठोक लूट; एक रुपयाची नवी नोट मिळतेय अध्र्या डॉलरला.

राम देशपांडे/प्रवीण खेते / अकोला: शहरातील मध्यवर्ती जुन्या-नव्या नोटांचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांनी नोटांचा बाजार मांडला असून, रिझर्व्ह बँकेने मार्च २0१५ मध्ये चलनात आणलेल्या एक रुपयाच्या नव्या नोटा प्रत्येकी ३0 रुपयाला विकण्याचा गोरखधंधाच चालविला आहे. राष्ट्रीय संपत्ती म्हणून गणल्या जाणार्‍या चलनी नोटा अधिक दराने विकल्या जात असल्याची बाब सोमवारी 'लोकमत' चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आली. डॉरलच्या तुलनेत आपल्याच देशात एक रुपयाच्या नोटेसाठी सामान्यांना अर्धा डॉलर किंमत मोजावी लागत असल्याने या ठिकाणी नोटांचा काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट होते.अकोल्यातील सराफा बाजाराजवळ 'बट्टय़ा'चा व्यवसाय करणार्‍यांची काही दुकाने आहेत. हे व्यावसायिक आपल्या मूळ व्यवसायाव्यतिरिक्त जुन्या-नव्या नोटा आणि नाणी खरेदी-विक्रीचा व्यवसायदेखील करतात. रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या नव्या नोटा आणि नाणीदेखील या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मार्च २0१५ मध्ये रिर्जव बँकेने नव्याने चलनात आणलेल्या एक रुपयाच्या नोटा या ठिकाणी अधिक दराने विकल्या जात असल्याची माहिती मिळाली. सोमवारी 'लोकमत'चमूने त्याच्या पडताळणीसाठी केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान या व्यावसायिकांनी चक्क नोटांचा बाजारच मांडला असल्याचे स्पष्ट आढळून आले. राष्ट्रीय संपत्ती म्हणून नव्याने चलनात आलेल्या एक रुपयाची नोटा या ठिकाणी चक्क प्रत्येकी ३0 रुपयांना विकल्या जात असल्याचे आढळून आले.स्टिंग ऑपरेशन करणार्‍या चमूने अधिक नोटांची मागणी केली असता, एक रुपयाच्या १0 नोटा २५0 रुपयांना देण्याची तयारी व्यावसायिकाने दर्शविली.ही बाब एवढय़ावरच संपत नाही, तर व्यावसायिकाने नुकतेच चलनात आलेले दीडशे रुपयाचे नाणे पाच हजार रुपयांना देऊ केले. चलनात येणार्‍या नव्या नोटा आणि नाणी सामान्य नागरिकांपर्यंंंत पोहोचण्यास विलंब लागतो. या काळात नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणार्‍या हौशी आणि सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता ताणलेली असताना, त्याची मागणी करणार्‍यांची गरज लक्षात घेऊन अधिक दराने नाणे-नोटांची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जात असल्याची खळबळजनक बाब या स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आली. अनेकांनी तर बट्टा बाजारमध्ये आपले बस्तान मांडले आहे आणि नागरिकांनी नाण्यांचे आकर्षक दाखवून हे व्यावसायिक लुबाडत आहेत. हौसेने वाढविली रुपयाची किंमतअसं म्हणतात, हौसेला किंमत नसते. त्याच हौसेपोटी पैशाला किंमत न देता, काडीमोलाच्या वस्तूसाठीही दुप्पट दाम द्यायला लोक तयार होतात. हाच प्रकार रुपयांच्या बाबतीतदेखील होत असेल, याचा कोणी विचारही केला नसेल; परंतु असा धक्कादायक प्रकार अकोल्यातील 'बट्टा' बाजारात होत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले. आंतरराष्ट्रीय बाजारात एका डॉलरची किंमत ६६.२१ रुपये आहे, पण नाणे संग्राहकांना हौस भागवण्यासाठी एका रुपयाच्या नवीन नोटेसाठी चक्क ३0 रुपये मोजावे लागत आहे. १५0 रुपयाचं नाणं पाच हजारालाभारतीय रिझर्व्ह बँकेच्यावतीने काही दिवसांपूर्वी एक रुपयाच्या नोटेसोबतच १५0 रुपयांच्या नाण्याचीदेखील निर्मिती केली आहे. हे नाणं चांदीचं असून, अद्यापही ते बाजारपेठेत चलनात आले नाही; परंतु शहरातील ह्यबट्टाह्ण बाजारात या नाण्याचे बुकिंग सुरू असून, त्यासाठी तब्बल पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याचे संबंधित व्यापार्‍याने 'लोकमत' चमूला स्टिंग ऑपरेशनदरम्यान सांगितले. बँक कर्मचारी म्हणतात..शहरातील 'बट्टा' बाजारात चालत असलेल्या रुपयांच्या काळाबाजाराचे स्टिंग ऑपरेशन करताना ह्यलोकमतह्ण चमू शहरातील काही बँकांमध्ये पोहोचली. येथे बँक कर्मचार्‍यांना एक रुपयाच्या नवीन नोटांबद्दल विचारले असता, गत दहा ते पंधरा वर्षांंपासून एक रुपयाची नोट बघितली नसून, नवीन नोटांची आम्हालादेखील प्रतीक्षा आहे, असे उत्तर यावेळी मिळाले.