शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार गावांच्या दुष्काळमुक्तीसाठी ‘बीजेएस’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:28 IST

अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान पूर्ण करणाऱ्या तीन हजार गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी व पोकलेन सारख्या अद्ययावत मशीन पुरविल्या जाणार आहेत.

ठळक मुद्दे या वर्षी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.तीन हजार गावातील लोक श्रमदान करणार आहेत.या सर्व गावांत भारतीय जैन संघटना विनामूल्य जेसीबी आणि पोकलेन पुरविणार आहे.

अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान पूर्ण करणाऱ्या तीन हजार गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी व पोकलेन सारख्या अद्ययावत मशीन पुरविल्या जाणार आहेत. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात येत असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया यांनी ओसवाल भवनातील पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे गावकºयांनी स्वत: या कार्यासाठी एकत्र यायचे, पाच लोकांना प्रशिक्षणाला पाठवायचे, आपल्या गावचा वॉटर शेड मॅनेजमेंट प्लॅन आपणच तयार करायचा व श्रमदानाने काम करून स्वावलंबी व्हायचे. गेल्या वर्षी ही स्पर्धा ३० तालुक्यांतील सर्व गावांमध्ये घेण्यात आली होती. या वर्षी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. ५९०० गावांनी या स्पर्धेत सहभागी होऊन प्रशिक्षण घेतले. यापैकी तीन हजार गावे तरी श्रमदानाचा टप्पा पूर्ण करतील. या तीन हजार गावातील लोक श्रमदान करणार आहेत. श्रमदानानंतर कठीण काम असणाºया गावातील काम नंतर मशीनद्वारे होणार आहे. खडक असलेल्या भागात जेसीबी किंवा पोकलेनद्वारेच काम करता येणार आहे. अशा ठिकाणी बीजेएसचा पुढाकार राहणार आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर, आणि बार्शीटाकळी या तालुक्यातील २३० गावे प्रशिक्षण घेऊन, या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. या सर्व गावांत भारतीय जैन संघटना विनामूल्य जेसीबी आणि पोकलेन पुरविणार आहे. जैन संघाने यासाठी पूर्णवेळ समन्वयक नेमले आहेत. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी संतोष पवार, आदीनाथ पवार, संदीप मस्के आणि सहदेव सुर्वे यांची नियुक्ती केली आहे. पत्रकार परिषदेला भारतीय जैन संघटनेचे शीतल खाबिया, नरेश चौधरी, शैलेंद्र पारख, अमरीश पारेख, समीप इंदेने, विजय चौधरी, प्रवीण कर्नावट, प्रशांत कोठारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. शांतीलाल मुथा २४ एप्रिल रोजी अकोल्यातभारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा पाणी फाउंडेशनच्या सभेसाठी मंगळवार, २४ एप्रिल रोजी अकोल्यात दुपारी ३.३० वाजता येणार आहेत. अकोला जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहितीदेखील येथे दिली गेली.

 

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा