शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

भाजपाचे ‘चॉकलेट’; शिवसेना, काँग्रेसची धार बोथट

By admin | Updated: June 26, 2017 09:52 IST

करवाढीच्या निर्णयावर भाजपा, प्रशासन ठाम, भारिप आक्रमक.

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाने एकाच दमात पुनर्मूल्यांकन आणि सुधारित करवाढ लागू केल्यामुळे अकोलेकरांवर करवाढीचा बोजा चढल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस, भारिप-बमसं आणि शिवसेनेने भाजपाच्याविरोधात रणशिंग फुंकले. विरोधकांच्या आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी कराच्या रकमेतून १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. सत्ताधाऱ्यांचा हा निर्णय विरोधकांच्या पचनी पडला नसला, तरी कायदेशीर लढाई लढण्यासाठी कोणताही पक्ष पुढाकार घेत नसल्यामुळे विरोधकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हे उपस्थित होण्याची वेळ आली आहे. राजकारणात उद्या काय होईल, याचा काही भरवसा नसतो. कधीकाळी केंद्र व राज्यात प्रदीर्घ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसच्या ह्यहाताह्णत अकोलेकरांनी महापालिकेची धुरा साडेसात वर्षांसाठी सोपवली होती. त्यापूर्वी २००१ ते २००६ पर्यंत मनपावर भाजपा-शिवसेनेची सत्ता होती. २००१-०२ मध्येच भाजपाने करवाढीचा निर्णय लागू केला होता; परंतु ती करवाढ अल्प असल्यामुळे त्यावर विरोधकांनी चुप्पी साधणे पसंत केले. २०१४ च्या मोदी लाटेत केंद्रासह राज्यात व महापालिकेत सत्ता परिवर्तन होऊन जनतेने भाजपाला पसंती दिली. फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन ८० जागांपैकी ४८ जागांवर विजयी केले. परिणाम स्वरूप शहराच्या विकास कामांसाठी यापूर्वी कधी नव्हे इतका कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत असून, विविध योजना मंजूर होत आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी व प्रशासनाने करवाढीचा निर्णय घेतला. मागील १९ वर्षांपासून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे मनपाच्या उत्पन्नाला खीळ बसली असून, शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे; परंतु सत्ताधाऱ्यांनी पुनर्मूल्यांकनासह अवास्तव कर वाढ लागू केल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसंने आंदोलन छेडले. विरोधकांच्या आंदोलनाची धार बोथट करण्याच्या उद्देशातून महापौर विजय अग्रवाल यांनी एकूण कराच्या रकमेतून दहा टक्के सूट देणार असल्याचे जाहीर केले असले तरी विरोधी पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असून कवेळ भारिप-बमसं आक्रमक पद्धतीने विरोध नोंदवित आहे. २८ ला भारिपचा मोर्चा अन् मनपा आमसभा वादळी ठरण्याची शक्यता ४२८ जून रोजी होणारी मनपाची आमसभा वादळी करण्याची तयारी विरोधकांकडून सुरू आहे. अकोला महापालिकेने अवाजवी कर आकारणी केल्याचा विरोध शहरात सुरू आहे. दरम्यान, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वाढीव टॅक्स रद्द करण्याकरिता २८ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यामध्ये उडी घेतली असून, ते स्वत: मागील वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर भरण्याकरिता जाणार आहेत. ४मोर्चाची पूर्वतयारी म्हणून महानगरात ठिकठिकाणी बैठकी सुरू आहेत. मोर्चा यशस्वी करण्याकरिता अ‍ॅड. धनश्री देव गटनेता, प्रतिभा अवचार जिल्हा प्रमुख महिला आघाडी, किरण बोराखडे, बबलू जगताप, गजानन गवई, रामा तायडे माजी नगरसेवक, अरुंधती शिरसाट, वंदना वासनिक, मंगला घाटोले, डॉ. राजकुमार रंगारी, मनोहर पंजवानी, प्रवीण पातोंड, लखन घाटोले, पराग गवई आदी परिश्रम घेत आहेत.भाजपा-सेनेत शीतयुद्धमहापालिकेत भाजपा आणि शिवसेनेत शीतयुद्ध रंगले आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व इतर योजनेचा निधी वाटप करताना महापौर विजय अग्रवाल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व भारिपच्या नगरसेवकांच्या तुलनेत शिवसेनेच्या नगरसेवकांना अत्यल्प निधी दिला. यावर शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.