शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

भाजप नगरसेविकेच्या दिराने केला शौचालय बांधकामात घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:54 IST

अकोला : हातामध्ये सत्ता आल्यानंतर काहीही करता येते, अशा आविर्भावात वावरणार्‍या भाजप नगरसेवकांच्या नातेवाइकांनी मनपा प्रशासनाच्या नाकीनऊ आणले आहेत. पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामात घोळ केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे.

ठळक मुद्देकारवाईच्या धास्तीने चूक कबूललोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांची दिशाभूल

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हातामध्ये सत्ता आल्यानंतर काहीही करता येते, अशा आविर्भावात वावरणार्‍या भाजप नगरसेवकांच्या नातेवाइकांनी मनपा प्रशासनाच्या नाकीनऊ आणले आहेत. पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामात घोळ केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी महापालिका कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच भीतीपोटी अमोल नामक दिराने चूक कबूल केली. असे असले तरी लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. एकूण प्रकार पाहता प्रशासन निष्पक्षपणे कारवाई करणार का, यावरच संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या नागरिकांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसेल, त्यांचा शोध घेऊन त्यांना शौचालय उभारून देण्याचे राज्य शासनाचे महापालिकेला निर्देश आहेत. या कामाची जबाबदारी प्रशासनाने क्षेत्रीय अधिकारी व आरोग्य निरीक्षकांवर सोपवली आहे. मार्च महिन्यात मनपाची सत्तासूत्रे स्वीकारणारे भाजपातील काही नगरसेवक व त्यांच्या नातेवाइकांनी स्वत:च कंत्राटदार होणे पसंत केले. यापूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारण करणार्‍या काही नगरसेवकांनी मनपाच्या आवारात पाऊल ठेवताच मनमानी कारभाराला सुरुवात केल्याचे दिसून येते. यामध्ये पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने कहरच केला. मित्राच्या नावाने असलेल्या बँक खात्याचा वापर करीत ‘अमोल’ नामक दिराने कंत्राटदाराची भूमिका पार पाडत प्रभागात वैयक्तिक शौचालयांची उभारणी केली. हातामध्ये सत्ता असली म्हणजे ‘सब कुछ हो सकता है’च्या आविर्भावात मनपात वावरणार्‍या या दिराने प्रभागातील नागरिकांची दिशाभूल करीत एक-दोन नव्हे, तर चक्क २२ शौचालयांचे बांधकाम कागदोपत्री दाखवून ३ लाख ३0 हजार रुपये लाटण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची प्रशासनाला कुणकुण लागल्यानंतर कारवाई व बदनामीच्या भीतीपोटी नगरसेविकेच्या नातेवाइकांनी ‘अमोल’ला चूक क बूल करण्यास भाग पाडले. प्रकरण निस्तरण्याचे सर्व उपाय केल्यानंतर आता मात्र संबंधित दिराने उचल खाल्ली असून, प्रशासनावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नगरसेवकांमार्फत दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची माहिती आहे. 

..तर यांच्यावरही करावी लागेल कारवाईकागदोपत्री शौचालय दाखवून मनपाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसल्यास भाजप नगरसेविकेच्या दिरासोबतच पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी, प्रभागात नियुक्त केलेला आरोग्य निरीक्षक, पात्र ठरलेले लाभार्थी व कंत्राटदारावर गंडांतर येईल. त्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने कारवाई करणार की चौकशी करून अहवाल गुलदस्त्यात ठेवणार, याबद्दल अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिका