शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या घटकपक्षांची भाजपालाच डोकेदुखी

By admin | Updated: August 27, 2014 00:00 IST

पश्‍चिम विदर्भ : शिवसंग्राम व स्वाभिमानीला हवे भाजपाचे मतदारसंघ

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजप-शिवसेना या दोन पक्षांच्या युतीमध्ये काही घटक पक्षांचा समावेश झाला आणि या युतीची महायुती झाली. महायुतीतील घटक पक्षांना सांभाळून घेण्याची जबाबदारी भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षांची असली तरी, प्रत्यक्षात मात्र या घटक पक्षांनी विधानसभा मतदारसंघावर केलेल्या दाव्यांमुळे भाजपाचीच डोकेदुखी जास्त वाढली आहे. पश्‍चिम विदर्भातील तीन मतदारसंघांवर शिवसंग्राम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा केला असून, विशेष म्हणजे हे तीनही मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याचे आहेत. पश्‍चिम विदर्भातून सर्वाधिक आमदार देणार्‍या बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदार संघांपैकी तीन मतदारसंघ भाजपकडे, तर चार सेनेकडे आहेत. खामगाव, चिखली, जळगाव व मलकापूर या तीन मतदारसंघांमध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे. चिखली व खामगाव या मतदारसंघात गतवेळी भाजपला यश मिळविता आले नाही. त्यापैकी चिखली मतदारसंघात २00९ मध्ये आमदार असलेल्या रेखाताई खेडेकर यांचे तिकीट कापून ऐनवेळी प्रकाशबुवा जवंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे येथे भाजपचा पराभव झाला. खामगावमध्ये सलग तीन वेळा भाजपाचा पराभव होत आहे. या दोन मतदारसंघांपैकी चिखली मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा केला आहे. महायुतीच्या कोट्यातून स्वाभिमानीला चिखली हा मतदारसंघ हवा असून, तशी जय्यत तयारी स्वाभिमानीने केली आहे. महायुती तुटली तरी चालेल; पण चिखली घेऊ, अशी निर्वाणीची भाषा स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांनी येथील मेळाव्यात वापरली होती. या पृष्ठभूमीवर चिखलीतील भाजप वतरुळात अस्वस्थता आहे. भाजपकडे दावेदारांची मोठी यादी असून, स्वाभिमानीच्या दाव्यामुळे हे सर्वच दावेदार आपआपल्या गॉडफादरकडे ह्यलॉबिंगह्ण करताना दिसत आहे. ** अकोला जिल्ह्यातील बाळापूरसाठी प्रयत्नअकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी अकोला पूर्व व आकोट हे शिवसेनेकडे, तर बाळापूर, अकोला पश्‍चिम आणि मूर्तिजापूर हे तीन मतदारसंघ भाजपकडे आहेत. या तीन मतदारसंघांपैकी बाळापूर मतदारसंघावर शिवसंग्राम संघटनेने दावा केला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांनी पश्‍चिम विदर्भात दोन जागा आम्ही लढवणार, अशी माहिती बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती. त्यामुळे महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामच्या अपेक्षांचेही ओझे भाजपावरच पडले आहे.** वाशिममध्ये रिसोडवर दावावाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून, जागा वाटपात त्यापैकी भाजपला दोन व शिवसेनेला एक मतदारसंघ मिळाला आहे. भाजपकडे असलेल्या दोन मतदारसंघांपैकी रिसोड मतदारसंघावर शिवसंग्रामने आपला हक्क सांगितला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे हे स्वत:च रिसोड या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले जाते.