शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणण्याची वेळ भाजपाने आणलीय - सुजात आंबेडकर

By atul.jaiswal | Updated: October 25, 2023 21:17 IST

अकोला  : २०१४ च्या  च्या निवडणुकीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी विचारणा भाजपाने केली होती.  आज याच भाजपाने ...

अकोला  : २०१४ च्या  च्या निवडणुकीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी विचारणा भाजपाने केली होती.  आज याच भाजपाने व राज्यातील मनुवाद्यांनी ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी येथे बोलताना केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आलेला धम्म मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते.

या प्रसंगी  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. दुपारी आंबेडकर यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गाने निघालेली ही यात्रा अकोला क्रिकेट स्टेडियमवर येऊन तिचे जाहीर मेळाव्यात रूपांतर झाले, तेथे आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. सुजात आंबेडकर यांनी यावेळी बोलताना राज्यातील भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) सरकारवर टीकेची झोड उठवली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाने नकली आंबेडकरवादी पुढे केल्याचे सांगून, त्यांच्यावर विश्वास न ठेवता निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले.

राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, दिल्लीतल्या नेत्याने नफरत की दुकान बंद करण्यासाठी प्रेमाची दुकान उघडली आहे, परंतु त्यांनी एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना आजमावून बघावे; भाजपाचा नफर चा बाजार उठवून दाखवू, असे सुजात आंबेडकर म्हणाले. देशातील संघ, भाजपच्या विचारधारेचा पराभव केवळ आंबेडकरवादी विचारधारच करू शकते. या विचारधारेला घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता नकली आंबेडकरवाद्यांना पे रोलवर ठेवले आहे. आपण सतर्क राहिलो नाही तर हे नकली आंबेडकरवादी आपल्या वस्त्यांमध्ये शिरून अपप्रचार करतील. असेच नकली आंबेडकरवादी आपल्या चळवळीत संभ्रम निर्माण करत असल्याचेही यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Akolaअकोला