शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांचे पुनर्वसन करणारं भाजपाचं सरकार - अशोक चव्हाण

By admin | Updated: February 11, 2017 18:22 IST

केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आलेले भाजपा सरकारमुळे गुंडांना चांगले दिवस आले. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 11 -  केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आलेले भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील सरकार आहे. या सरकारमध्ये सामान्यांचे भले होत नाही, मात्र गुंडांना चांगले दिवस आलेत. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.  
 
काँग्रेसच्या काळात सरकारमध्ये मदत व पुनर्वसन खाते होते, भाजपाच्या काळात हेच खाते गुंडांसाठी मदत व पुनर्वसन असे झाले असून, हे सरकार केवळ गुंडांचे पुनर्वसन करणारे सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 
 
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ स्थानिक स्वराज्य भवन मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री नसीम खान, डॉ. नितीन राऊत, आमदार भाई जगताप, महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी आदी उपस्थित होते. 
 
या सरकारचे मंत्री गुंडांची स्तुती करतात. त्यांना आधी पक्षात घेऊ, निवडून आणू व मग सुधरवणार, अशी भाषा करतात. केवळ गुंडांचे पुनर्वसन हाच या सरकारचा अजेंडा असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या काळात ज्या योजना राबवल्या गेल्या, त्याच योजनांची नावे बदलून हे सरकार काम करीत आहे. 
 
एकही नवी योजना सुरू केली नाही. ज्या चांगल्या योजना होत्या, त्या बंद पाडल्या. मुस्लीम, मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही. शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, उलट भाजपा सरकारमध्ये त्या वाढल्या. त्यामुळे येणा-या काळात भाजपाला सत्तेतून घालवण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री नसीम खान यांनी महापालिकेचे निकाल हे राजकारणाची दिशा बदलवणारे निकाल असतील, असा आशावाद व्यक्त केला.
 
राजीनामा देणार पण तारीख नाही सांगणार 
भाजपासोबत सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणी विचारत नाही, राजीनामा खिशात असल्याच्या वल्गना हे मंत्री करतात. हा प्रकार म्हणजे ‘मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे’ याच धर्तीवर ‘इस्तीफा जरूर देगें पर तारीख नही बतायेंगे’ असाच आहे असा आरोप चव्हाण यांनी केला. चव्हाण यांनी भाजपा-सेनेवर तोंडसुख घेतांना राष्ट्रवादीवर टीका करणे मात्र टाळले.