शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

भाजप सरकारने शेतकरी, शेतमजुरांना कंगाल केले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:10 IST

गेल्या तीन वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी व सरकारी धोरण, शेतमालाला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अशातच सरकारने अचानक कॅशलेस केल्यामुळे तर सगळ्याच शेतमालाचे भाव एकाच फटक्यात निम्म्यावर आणून शेतकर्‍यांना कंगाल केले असल्याची टीका किसान मंचचे निमंत्रक शेतकरी नेते शंकरअण्णा धोंगडे यांनी केली. कानडी येथील शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देशंकरअण्णा धोंगडे यांची टीकाकानडी येथे शेतकरी सुरक्षा अभियानांतर्गत सभा

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गेल्या तीन वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी व सरकारी धोरण, शेतमालाला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अशातच सरकारने अचानक कॅशलेस केल्यामुळे तर सगळ्याच शेतमालाचे भाव एकाच फटक्यात निम्म्यावर आणून शेतकर्‍यांना कंगाल केले असल्याची टीका किसान मंचचे निमंत्रक शेतकरी नेते शंकरअण्णा धोंगडे यांनी केली. कानडी येथील शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. किसान मंचच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील कानडी येथे मेळावा व बैठक आयोजित करण्यात आली होती. मेळाव्याला संबोधित करताना धोंगडे यांनी भाजप, सेना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की शेतकरी ऊठसूट किंवा मागायचे म्हणून मागत नाही तर शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कष्टकर्‍यांवर यापूर्वी कधी नव्हे एवढे आर्थिक अरिष्ट ओढवल्याने ते कर्जमाफीची मागणी करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे सहकारी निवडणुकीपूर्वी दिलेली वचने व आश्‍वासने पूर्ण करण्याऐवजी टिंगलटवाळी व कुचेष्टा करण्यातच धन्यता मानत आहेत, असे ते म्हणाले.धोंगडे हे किसान मंच (महाराष्ट्र)चे निमंत्रक असून, त्यांचे अभियान ५५ दिवसांचे आहे. राज्यातील ३0 जिल्ह्यातून फिरून अभियानाचा समारोप २ ऑक्टोबर रोजी होणार्‍या नाशिकच्या शेतकरी मेळाव्यात होणार आहे. शेतकरी, शेतमजुरांसाठी सरकारकडे केलेल्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास नाशिकच्या शेतकरी अधिवेशनात सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन केल्या जाणार असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले.या मेळाव्याचे आयोजन शेतकरी जागर मंचच्यावतीने करण्यात आले होते. किशोर माथनकर किसान मंच संयोजक व प्रशांत गावंडे जागर मंच यांनी या सभेत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात मनोज तायडे, जगदीश मुरूमकर, जि. प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, अशोक लोडम, वसंतराव माळोकार, पंजाबराव गावंडे, बाळकृ ष्ण पाटील, शिवाजी म्हैसने, शेख अन्सार आदी उपस्थित होते.