शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून चाचपणी!

By admin | Updated: September 1, 2014 21:51 IST

विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा तिढा वाढतच आहे.

अकोला- विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा तिढा वाढतच आहे. अशातच भाजपने १४४ जागांवर दावा केल्याने महायुतीत संघर्ष पेटला आहे. एकूणच परिस्थितीमध्ये भाजपने राज्यातील सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टिकोणातून चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी जूनपासून आतापर्यंत तीन वेळा सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपकडून सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत सेनेच्या मतदारसंघांमध्येही भाजपचा सक्षम उमेदवार कोण असू शकतो, याची चाचपणीही करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात १९९0 पासून भाजप आणि शिवसेना यांच्यात युती आहे. २00९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११९ तर शिवसेनेन १६९ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी भाजपने ४६ तर शिवसेनेने ४५ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीनंतर पुढच्या पाच वर्षात भाजपने राज्यात त्यांचे बळ वाढविले. अकोला जिल्ह्यात केवळ शहरापुरता र्मयादित असा ठपका असलेल्या भाजपने २0१३ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ११ जागा मिळविल्यात. अकोला पंचायत समितीवर शिवसेनेच्या मदतीने झेंडा फडकविला. त्यापूर्वी जिल्ह्यात भाजपचे केवळ ४ जिल्हा परिषद सदस्य होते. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राज्यात भाजपचा वरचष्मा राहिला. भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळविला. हाच धागा पकडून आता भाजपने राज्यात १४४ जागांवर दावा केला आहे. अर्थातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रातील प्रमुख मंत्र्यांपैकी एक असलेले नितीन गडकरी यांनी जाहीरपणे केलेल्या या वक्तव्यामुळे भाजप ५0 टक्के जागांवर कायम राहणार हे स्पष्ट आहे. याच मुद्यावरून शेवटच्या क्षणी महायुती तुटल्यास पूर्वतयारी म्हणून भाजपने २८८ जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली आहे. विद्यमान आमदारांपैकी ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशा आमदारांसोबतच जे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात नाहीत, अशा मतदारसंघांमध्येही भाजपचा कोणता उमेदवार सक्षम असू शकतो, या दृष्टिकोणातून तीन-तीन वेळा चाचपणी करण्यात आली आहे.

** युती तुटल्यास फायदा कुणाला?

विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांना बाजुला ठेवून निवडणूक लढविल्यास होणार्‍या मत विभाजनाचा फायदा कुणाला होईल, याबाबतही भाजपकडून चाचपणी करण्यात आली. शिवसेनेला बाजूला ठेवून निवडणूक लढविल्यास भाजपला किती तोटा होईल आणि प्रतिस्पर्धी पक्षांना त्याचा किती फायदा होऊ शकेल, या दृष्टिकोणातूनही चाचपणी करण्यात आली.

** सेनेच्या संपर्कप्रमुखांना महायुतीची आशा!

भाजपने २८८ जागांवर उमेदवारांची चाचपणी केल्याच्या पृष्ठभूमीवर शिवसेनेची भूमिका काय राहील, हे जाणून घेण्यासाठी पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महायुती कायम राहील, असा विश्‍वास व्यक्त केला. पक्षाचे बळ जाणून घेण्यासाठी सर्व्हे करण्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. जागा वाटपाचा निर्णय चर्चेतून घेतला जाईल, असे रावते म्हणाले.

** जिल्ह्यातील दोन्ही आमदारांबाबत नकारात्मक सूर

राज्यातील भाजपच्या आमदारांची त्यांच्या गत पाच वर्षातील कामांच्या आधारावर चाचपणी करण्यात आली. त्यांच्या मतदारसंघातून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये आमदारांबाबत मतदारांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेत करण्यात आला. त्यात अकोला जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही आमदारांबाबत नकारात्मक सूर उमटला. तिकीट वाटप करताना या बाबींचा विचार होणार आहे. अशा स्थितीत अकोला पश्‍चिममधून आ. गोवर्धन शर्मा यांच्या ज्येष्ठतेचा आणि सलग चार वेळा निवडून आल्याच्या मुद्याचा पक्षस्तरावर कितपत गांभीर्याने विचार केला जातो हे स्पष्ट होईलच; मात्र मूर्तिजापूरमधून आ. हरीश पिंपळे यांना भाजप पुन्हा मैदानात उतरविण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.