शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे नगरसेवक अनिल गरड अपात्र

By admin | Updated: June 7, 2017 01:31 IST

अकोला: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाचे नगरसेवक अनिल गरड यांच्यावर अवघ्या तीन महिन्यांतच अपात्र होण्याची वेळ आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाचे नगरसेवक अनिल गरड यांच्यावर अवघ्या तीन महिन्यांतच अपात्र होण्याची वेळ आली. एसटी महामंडळात सेवारत असताना अनिल गरड यांनी स्वायत्त संस्थेची निवडणूक लढल्याप्रकरणी तक्रारकर्ते विजय मालोकार यांनी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्याकडे याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नगरसेवक गरड यांना अपात्र करण्याचे आदेश जारी केले. फेब्रुवारी २०१७ मध्ये मनपाची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. एसटी महामंडळात सेवारत असलेल्या अनिल गरड यांनी भाजपाच्यावतीने प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढवली आणि निवडणुकीत विजयी झाले; परंतु महामंडळात सेवारत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक लढण्यापूर्वी पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. राजीनामा दिल्यानंतर कर्मचारी निवडणूक लढण्यास पात्र ठरतो. अनिल गरड यांनी महामंडळात सेवारत पदाचा राजीनामा न देता निवडणूक लढवली. याप्रकरणी शिवसेना नेते विजय मालोकार यांनी एसटी महामंडळासह विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे मार्च महिन्यात तक्रार दाखल केली. विभागीय आयुक्तांकडे तीन वेळा सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती अनिल गरड यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी जारी केला आहे. यासंदर्भात नगरसेवक अनिल गरड यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. हायकोर्टात कॅव्हेट दाखल!विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी अनिल गरड यांच्याकडे हायकोर्टाचा पर्याय आहे. ही बाब लक्षात घेता तक्रारकर्ते विजय मालोकार यांनी नागपूर खंडपीठात कॅवेट दाखल केल्याची माहिती आहे.