शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा उमेदवार विजय अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: February 21, 2017 01:55 IST

शिवसेना नेते विजय मालोकार यांच्या तक्रारीवर पोलिसांची तत्काळ कारवाई.

अकोला, दि. २0- भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी प्रचार संपल्यानंतरही देवाच्या छायाचित्रांचा आधार घेत सोमवारी फलक लावून प्रचार सुरूच ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते विजय मालोकार यांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन ही कारवाई केली.भाजपाचे प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार विजय अग्रवाल हे महापालिका निवडणूक रिंगणात आहेत. महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार करण्यास, तसेच फलक लावण्यास रविवारी सायंकाळी ६ वाजेनंतर बंदी घालण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही विजय अग्रवाल यांच्याकडूनच संचालित असलेल्या विजय संकल्प फाउंडेशनच्या नावे अग्रवाल यांचा प्रचार करणारे फलक प्रभाग क्रमांक पाचमधील मोरेश्‍वर कॉलनी येथे लावण्यात आले आहे. सदर फलकावर भाजपाची निशाणी असलेले कमळही असल्याने या प्रकरणाची तक्रार शिवसेना नेते विजय मालोकार यांनी सोमवारी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर विजय अग्रवाल यांच्याविरुद्ध शहर विद्रूपीकरण कायद्याच्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिवसेना नेते विजय मालोकार यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना सांगीतले की, विजय अग्रवाल यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे; मात्र आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर निवडणूक आयोगाकडेही तक्रार करणार आहे. जाहीर प्रचारास बंदी असतानाही विजय संकल्प या नावाखाली मतदारांना कॅलेंडर वाटप करणे आणि कमळाची निशाणी असलेले फलक लावणे हा मोठा गुन्हा असून, यानुसार क ारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.दरम्यान, विजय अग्रवाल यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेल्या परिसरात विजय संकल्प फाउंडेशनच्या नावाने झळकलेल्या फलकावर एवढा गहजब करण्याचे कारण नसल्याची सबब दिली. या फाउंडेशनचे सदस्य नसून निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हा प्रकार दिसून येत असल्याची त्यांनी पुस्ती जोडली. पोलिसांच्या व्हॉट्सअँप क्रमांकावर तक्रारआचारसंहिता भंग करणार्‍यांची तक्रार करण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी व्हॉट्सअँप क्रमांक दिला आहे. शिवसेना नेते विजय मालोकार यांनी या क्रमांकावरही विजय अग्रवाल यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, त्यानंतर आचारसंहिता भंग प्रकरणाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.