शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २७ जणांना चावा; महापालिका झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:11 IST

पिसाळलेल्या कुत्र्याने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह २७ जणांचे लचके तोडल्यानंतरही महापालिकेचा कोंडवाडा विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याची परिस्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील अकोट फैल परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल २७ जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह २७ जणांचे लचके तोडल्यानंतरही महापालिकेचा कोंडवाडा विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याची परिस्थिती आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहराच्या गल्लीबोळात मोकाट कुत्रे व डुकरांनी अक्षरश: उच्छाद मांडल्याची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी भटके कुत्रे व डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळकरी मुले व वयोवृद्ध नागरिकांना फिरणे अवघड झाले आहे. मोकाट गुरेढोरे, कुत्रे व डुकरांच्या उच्छादामुळे सर्वसामान्य अकोलेकरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असताना महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रभाग क्रमांक दोनमधील अकोट फैल, शंकर नगर, मेहमुद नगर, मौलाना अब्दुल कलाम चौक परिसरात मागील सात दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.पिसाळलेल्या कुत्र्याने सात दिवसांच्या कालावधीत ११ आणि रविवारी तब्बल १६ जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. यामध्ये लहान मुलांचा सर्वाधिक समावेश असून, काही पुरुष व महिलासुद्धा जखमी झाल्या आहेत. लहान मुलांच्या मानेजवळ, खांद्याला, हाताला तसेच पाठीला चावा घेण्यात आल्याचे चित्र रविवारी सर्वोपचार रुग्णालयात पाहावयास मिळाले.या घटनेमुळे सर्वोपचार रुग्णालयात जखमी व त्यांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने जखमी आल्यामुळे रेबिजची लस देताना सर्वोपचारमधील यंत्रणेची तारांबळ उडाली होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाdogकुत्रा