शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मेव्हण्याचा खून करणा-यास जन्मठेप

By admin | Updated: December 19, 2014 01:08 IST

बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय.

चिखली (जि.बुलडाणा) : जावई असल्याने सासरवाडीत केवळ आपलेच लाड पुरविले जावेत या मानसिकतेतून आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय मेव्हण्याचा गळा आवळून खून करणार्‍या गजानन नारायण गुंजाळ याला बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी जन्मठेप व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.२0 मार्च २0१४ ला मध्यरात्रीच्या सुमारास सवणा येथील समाधान नामदेव साजरे यांचा मुलगा गजानन साजरे (५) हा आईच्या कुशीत झोपलेला असताना त्यास उचलून नेवून त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर घरामागे त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर मृताच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीवरून सवणा येथीलच प्रल्हाद नारायण खडके यांना अटक केली होती. मात्र, या प्रकरणातील खरा आरोपी दुसराच असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यानुषंगाने तपासाची दिशा ठरवत सवणा येथे तळ ठोकला होता. दरम्यान तपास अधिकारी व कर्मचार्‍यांनी अत्यंत शिताफीने मृतक मुलाच्या कुटूंबियांची मानसिकता सांभाळून मृतक मुलाचा मेव्हणा गजानन गुंजाळ यास अटक करून बोलते केले. त्यावेळी त्याने सासरी मिळत असलेली दुय्यम वागणूक व सासर्‍याच्या मालमत्तेवर डोळा ठेवून गजाननचा खून केल्याची कबूली दिली.याप्रकरणी गुन्हय़ाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयामध्ये आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयामध्ये सरकार पक्षाकडून आरोपीविरूध्द एकूण ९ पुरावे तपासण्यात आले. आरोपी गजानन गुंजाळ यास १८ डिसेंबर रोजी वि.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जोशी यांनी जन्मठेप व २ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.